मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राधेला बसला ट्रोलर्सचा दणका; सलमानला मिळालं करिअरमधील सर्वात कमी रेटिंग

राधेला बसला ट्रोलर्सचा दणका; सलमानला मिळालं करिअरमधील सर्वात कमी रेटिंग

सलमानच्या चाहत्यांवगळता कोणालाही हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सलमानच्या करिअरमधील आजवरचा सर्वात वाईट चित्रपट असं म्हणत राधेची निंदा केली जात आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 16 मे: सलमान खानचा (Salman Khan) राधे (Radhe) हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर 13 मे रोजी प्रदर्शित झाला. लॉकडाउनमुळं दोन वेळा या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आलं होतं. परंतु अखेर सिनेमागृह आणि Zee5 या OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटावर सध्या टीकेचा वर्षाव सुरु आहे. सलमानच्या चाहत्यांवगळता कोणालाही हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सलमानच्या करिअरमधील आजवरचा सर्वात वाईट चित्रपट असं म्हणत राधेची निंदा केली जात आहे.

एआयडीबी या वेबसाईटवर दिल्या जाणाऱ्या फिल्म रिव्ह्यूला जगभरात खुप महत्व दिलं जातं. विशेष म्हणजे या वेबसाईटवर सर्व सामान्य प्रेक्षकच आपले रिव्ह्यू लिहतात. आणि त्यांच्या प्रतिक्रियांवरुन चित्रपटांचं रेटिंग ठरतं. तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या राधेवर देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु त्यापैकी 90 टक्के रिव्ह्यू हे चित्रपटावर टीका करणारे आहेत. राधेला आतापर्यंत 10 पैकी 1.9 इतकं कमी रेटिंग मिळालं आहे. अनेक जण या चित्रपटासाठी सलमान खानची खिल्ली उडवत आहेत.

Radhe पायरेडेट पाहू नका... अन्यथा सायबर सेल करेल तुमच्यावर अशी कारवाई

13 मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात तो Zee5 च्या झी प्लेक्स (Zee plex) वर प्रदर्शित करण्यात आला. राधेला रेटिंग जरी कमी मिळालं असलं तरी कमाईच्या बाबतीत तो मागे नाही. पहिल्याच दिवशी जवळपास 2.25 कोटींची कमाई या चित्रपटानं केली. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातंही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या (UAE) फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर विचार करता एक गोष्ट मात्र लक्षात येते टीकाकारांनी किती कमी रेटिंग दिलं तरी सलमानचे चाहते त्याला हिरमोड होऊ देणार नाही.

First published:

Tags: Salman khan