Home /News /entertainment /

Shreya Bugde: खऱ्या करीनाला लाजवेल अशी ही थुकरटवाडीची 'अवली बेबो', VIDEO बघाच

Shreya Bugde: खऱ्या करीनाला लाजवेल अशी ही थुकरटवाडीची 'अवली बेबो', VIDEO बघाच

श्रेया बुगडे (shreya bugde in chala hawa yeu dya) या अष्टपैलू अभिनेत्रीने बॉलिवूडच्या बेबोचा अभिनय करून प्रेक्षकांना दंग करून सोडलं आहे. तिचा हा स्पेशल विडिओ पाहाच

  मुंबई 3 जुलै: झी मराठीवरील चला हवा येऊ द्या (Chala hawa yeu Dya) कार्यक्रमात दरवेळी नवनवे स्किट आणि प्रयोग होताना दिसतात. यावेळी नव्या एपिसोडमध्ये ‘3 इडियट्स’ या फिल्मचं कॉमेडी स्किट सादर होणार आहे. यामध्ये श्रेया बुगडे (Shreya Bugde) करीना कपूरचं काम करताना दिसत आहे. खऱ्या करीनापेक्षा सध्या श्रेयाने केलेल्या या स्किटची बरीच चर्चा होताना दिसत आहे. हवा येऊ द्या कार्यक्रमात कायमच नवनवीन भन्नाट स्किट सादर होत असतात. ऍक्शन असो किंवा कॉमेडी सगळ्या पद्धतीच्या चित्रपटांचं विडंबन करून हवा येऊ द्या ची टीम त्याला आपला एक तडका लावताना दिसते. यातील कलाकार तर एक नंबर अवली पण कामाच्या बाबतीत तितकेच चोख आहेत. एखाद बेअरिंग कसं पकडावं हे त्यांच्याकडून हुबेहूब शिकावं. सध्या श्रेयाचा एका रोलचं बरंच कौतुक होत आहे. 3 इडियट्स चित्रपटात रँचोची गर्लफ्रेंड असणारी पिया हा रोल ती या स्किटमध्ये सादर करत आहे. खऱ्या आयुष्यात करीना कपूर जशी बोलते त्याच परफेक्ट अनुकरण श्रेयाने केलं आहे. लाल हेल्मेट घालून आलेल्या लुकमध्ये श्रेया जब वि मेट चित्रपटातला करीनाचा फेमस डायलॉग बोलताना दिसते. “मेरी आज तर्क एक भी ट्रेन नहीं छुटी बाय गॉड! थँक यु बाबाजी!” असं म्हणत श्रेया सगळ्यांना भारावून टाकेल असा करीना कपूरचा अभिनय करताना दिसते. उपस्थित मान्यवर सुद्धा तिच्या या रोलचं भरभरून कौतुक करताना दिसतात.
  श्रेया ही हवा येऊ द्या टीमचा एक मोठा पिलर समजली जाते. तिच्या टॅलेन्टला तोड नाही हेच खरं आहे. तिच्या अंगावर कोणतीही भूमिका सोपवली तरी ती त्याच ताकदीने ती निभावते ही तिची खासियत आहे. हवा येऊ द्या टीममध्ये स्त्रियांचं नेतृत्व करणारी श्रेया एकमेव स्त्री होती. त्यानंतर स्नेहल शिदमी सुद्धा या टीममध्ये दिसून आली. हे ही वाचा- Shivani Rangole: निव्वळ गुलाबी कॉटन कँडी! 'SHE' मधील रूपाचा नवा लुक पाहिलात का? चला हवा येऊ द्या कार्यक्रमात कायमच मोठमोठ्या पाहुण्यांची मांदियाळी असते. नुसतंच मराठी नव्हे तर हिंदी स्टार्सना सुद्धा इथे येण्याचं मोठं आकर्षण असतं. कलाकार आणि उपस्थित राहणारे पाहुणे कायमच या टीमचं कौतुक करताना दिसतात.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Chala hawa yeu dya, Shreya bugde

  पुढील बातम्या