मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

श्रद्धा कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडने काढले साराचे असे फोटो की..., क्षणातच झाले VIRAL

श्रद्धा कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडने काढले साराचे असे फोटो की..., क्षणातच झाले VIRAL

सारा अली खान

सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पाहा PHOTO.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 ऑक्टोबर : आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असते. आल्पावधीतच तिनं आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. कधी मजेशीर शायरीमुळे, कधी ग्लॅमरस लुकमुळे, तर कधी कॉमेडी व्हिडीओंमुळे ती कायम चर्चेत असते. अशातच साराचे नवे फोटो समोर आले आहेत. मात्र चर्चा रंगलीये फोटोग्राफरची.

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा खूप सुंदर हसताना दिसत आहे. अभिनेत्रीची स्टाईल पाहून चाहत्यांसह सेलेब्सही तिची जोरदार प्रशंसा केली आहे. सारा अली खानने पांढऱ्या क्रॉप टॉप आणि रिप्ड डेनिम जीन्समध्ये स्वतःचे तीन मूडी फोटो शेअर केले आहेत.सारा अली खानची ही छायाचित्रे सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठने क्लिक केली आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक्स बॉसफ्रेंड आहे. साराचे हे लेटेस्ट फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेटंचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सारा अली खान लवकरच तिचा आगामी चित्रपट 'गॅसलाइट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता विक्रांत मेस्सी दिसणार आहे. त्याचबरोबर साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवास सारा लक्ष्मण उतेकरच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत विकी कौशल स्क्रीन शेअर करणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Sara ali khan, Shraddha kapoor