मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

श्रद्धा कपूर-टायगर श्रॉफचा पुन्हा पडद्यावर रोमान्स; अभिनेत्रीच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा?

श्रद्धा कपूर-टायगर श्रॉफचा पुन्हा पडद्यावर रोमान्स; अभिनेत्रीच्या हाती लागला आणखी एक मोठा सिनेमा?

 बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना ऑनस्क्रीन प्रचंड पसंत करण्यात आलं आहे. यातीलच एक जोडी म्हणजे श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ही होय.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना ऑनस्क्रीन प्रचंड पसंत करण्यात आलं आहे. यातीलच एक जोडी म्हणजे श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ही होय.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना ऑनस्क्रीन प्रचंड पसंत करण्यात आलं आहे. यातीलच एक जोडी म्हणजे श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ही होय.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई,16 ऑगस्ट-   बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना ऑनस्क्रीन प्रचंड पसंत करण्यात आलं आहे. यातीलच एक जोडी म्हणजे श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ ही होय. या जोडीने 'बागी' या चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. चाहते टायगर आणि श्रद्धाला पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा सतत व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच श्रद्धा आणि टायगर एकत्र झळकणार आहेत. ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल. गेली बरेच दिवस श्रद्धा पडद्यापासून दूर आहे. परंतु सध्या श्रद्धा पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी तयार आहे. श्रद्धा कपूरकडे सध्या एकापेक्षा एक बिग बजेट चित्रपट आहेत. आगामी काळात अभिनेत्री लव रंजनच्या एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव अजून निश्चित झालेलं नाहीय.तसेच 'चालबाज इन लंडन', 'नागिन', 'स्त्री 2' यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे. दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या आगामी 'बडे मिया छोटे मियाँ' या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरलाही अप्रोच करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात श्रद्धा टायगरसोबत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या रिमेकसाठी श्रद्धाला अप्रोच करण्यात आलं आहे. या रिपोर्टनुसार, टायगरसोबत या चित्रपटात श्रद्धाने काम करावं अशी निर्मात्यांची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. तसेच, निर्मात्यांना टायगर आणि श्रद्धाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा परत आणायची आहे. याआधी श्रध्दा कपूर आणि टायगर श्रॉफची जोडी एप्रिल २०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'बागी'मध्ये दिसली होती. परंतु आगामी प्रोजक्टबाबत श्रद्धा आणि टायगरने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. (हे वाचा:Salaar Movie: 'सालार'साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन; रिलीज डेट समोर येताच सिनेमा होतोय ट्रेंड ) डेव्हिड धवन यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा विनोदी चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांची जोडी झळकली होती. या चित्रपटाचा रिमेक सध्या बनवला जात आहे.फेब्रुवारी 2023मध्ये या चित्रपटाच्या रिमेकच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन शोधण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shraddha kapoor, Tiger Shroff

पुढील बातम्या