मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salaar Movie: 'सालार'साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन; रिलीज डेट समोर येताच सिनेमा होतोय ट्रेंड

Salaar Movie: 'सालार'साठी प्रभासने घेतलंय अफाट मानधन; रिलीज डेट समोर येताच सिनेमा होतोय ट्रेंड

 'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास सध्या आपल्या आगामी 'सालार' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास सध्या आपल्या आगामी 'सालार' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास सध्या आपल्या आगामी 'सालार' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

  मुंबई, 16 ऑगस्ट-   'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास सध्या आपल्या आगामी 'सालार' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. प्रभासच्या या बहुचर्चित चित्रपटाचं दिग्दर्शन 'केजीएफ'चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केलं आहे. 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी 'सालार'ची रिलीज डेटही जाहीर केली आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. परंतु याच दिवशी बॉलिवूडचा आणखी एक बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहे.हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टारर 'फाइटर' असं या चित्रपटाचं नाव आहे.दरम्यान रिलीज डेट समोर येताच 'सालार' सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टारर अॅक्शन चित्रपट 'फाइटर' ची संभाव्य रिलीज डेटदेखील 28 सप्टेंबर 2023 आहे. दरम्यान आता 'सालार' या साऊथच्या बिग बजेट चित्रपटाची रिलीज डेटसुद्धा काल जाहीर करण्यात आली आहे. 'सालार'च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर करताच दोन्ही चित्रपटांची पडद्यावर जबरदस्त टक्कर होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अशातच प्रभासचा 'सालार' आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडसमोर साऊथ सिनेमा भारी पडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 'सालार'साठी प्रभासने घेतलंय इतकं मानधन- 'बाहुबली' या चित्रपटामुळे अभिनेता प्रभास फक्त देशातच नव्हे तर जगभरात तुफान लोकप्रिय झाला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची जगभरातील चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. या बाहुबलीनंतर प्रभास साऊथमधील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक ठरला आहे. प्रभासचा 'राधेश्याम' फ्लॉप झाला असला, तरी अभिनेत्याचा भाव अजिबात वधारला नाहीय. मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासने 'सालार' साठी थेट 100 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच त्याच्यासोबत 10 टक्के डिस्ट्रिब्युट शेअर करण्यात आले आहेत. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर प्रभास या चित्रपटामुळे सर्वात महागडा अभिनेता बनणार हे नक्की. परंतु अभिनेत्याने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीय. (हे वाचा: Saif Ali Khan B'day: 800 कोटींचा राजवाडा, महागड्या कार, मुंबईत बंगले; सैफची एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क) तत्पूर्वी प्रभासच्या सालारबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी नुकतंच सालारचं दमदार पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये सुपरस्टार प्रभास रफ आणि टफ लुकमध्ये दिसून आहे. 'सालार' हा विजय किरागांडूर निर्मित हाय-व्होल्टेज अॅक्शन चित्रपट आहे.प्रभासच्या या बिग बजेट चित्रपटाचं शूटिंग भारत,आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये करण्यात आलं आहे. हा चित्रपट आता हृतिक आणि दीपिकाच्या चित्रपटावर कसा परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Deepika padukone, Entertainment, Hritik Roshan, South indian actor

  पुढील बातम्या