मुंबई, 03 नोव्हेंबर : अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सिनेमांव्यतिरिक्त तिच्या नम्र आणि उदार स्वभावासाठी ओळखली जाते. शूटिंगच्या दरम्यानंही ती तिथल्या क्रू मेंबरसोबत मस्ती करताना दिसते. एवढंच नाही तर त्यांच्यासोबतचे फोटोसुद्धा ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. याशिवय तिला प्राण्यांबद्दलही विशेष प्रेम आहे. नुकताच श्रद्धाचा बॉडीगार्ड अतुल कांबळे याचा वाढदिवस झाला. मग काय श्रद्धांनं अतुलला एक खास सरप्राइज दिलं. तिनं चक्क अतुलसाठी मराठीमधून पोस्ट लिहत त्याला शुभेच्छा दिल्या. श्रद्धा कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अतुलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिनं अतुलसाठी मराठीमधून पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या. याशिवाय तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. ज्यात ती अतुलसोबत केक कापताना दिसत आहे. काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि…
अतुलला शुभेच्छा देताना श्रद्धानं लिहिलं, माझ्या आयुष्यातील महत्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्या सारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो! I Love you. Happy birthday!!! KBC 11 : आई आजारी होती आणि मी देशासाठी खेळत होते, बिग बींसमोर रडली हिमा दास
श्रद्धाचा बॉडीगार्ड अतुल हा मराठी असल्यानं श्रद्धानं त्याला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहे. श्रद्धाच्या या कृतीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यावरुन श्रद्धा तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची किती काळजी घेते हे दिसून येतं. श्रद्धा कपूर लवकरच टायगर श्रॉफसोबत ‘बागी 3’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. याशिवाय वरुण धवनसोबत तिचा ‘स्ट्रीट डान्सर’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घटस्फोटानंतर मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज ? आता असं आहे दोघांमधील नातं ================================================================ परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT