जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Celebes Education: श्रद्धा कपूरने विदेशातून घेतलंय उच्चशिक्षण; सिनेमाची ऑफर मिळताच बदलला करिअर प्लॅन

Celebes Education: श्रद्धा कपूरने विदेशातून घेतलंय उच्चशिक्षण; सिनेमाची ऑफर मिळताच बदलला करिअर प्लॅन

Celebes Education: श्रद्धा कपूरने विदेशातून घेतलंय उच्चशिक्षण; सिनेमाची ऑफर मिळताच बदलला करिअर प्लॅन

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स आपली ओळख बनण्यासाठी धडपडत आहेत. मात्र यामध्ये एक अभिनेत्री अशी आहे, जिला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. आज ती या इंडस्ट्रीमध्ये ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळखली जाते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  2 सप्टेंबर-   बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स आपली ओळख बनण्यासाठी धडपडत आहेत. मात्र यामध्ये एक अभिनेत्री अशी आहे, जिला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. आज ती या इंडस्ट्रीमध्ये ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळखली जाते. आपण अभिनेत्री श्रद्धा कपूरबाबत बोलत आहोत. एक स्टारकिड असूनही श्रद्धाने आपली एक खास ओळख बनवली आहे. उत्तम अभिनय, अप्रतिम सौंदर्य आणि तितकंच साधं राहणीमान यामुळे श्रद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आज आपण अभिनेत्रीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबाबत जाणून घेणार आहोत.

News18

श्रद्धा कपूरने 2010 मध्ये दिग्दर्शिका अंबिका हिंदुजा यांच्या ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस श्रद्धासाठी फारच कठीण होते. कारण तिच्या रिलीज झालेल्या दोन्ही चित्रपटांना अपयश मिळालं होतं. एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर श्रद्धा कपूरचं करिअर धोक्यात आलं होतं. त्यामुळे तिला एका हिट चित्रपटाची गरज होती. आणि सुदैवाने श्रद्धाला ‘आशिकी 2’ च्या रुपात ही संधी मिळाली होती. 90 च्या दशकातील आशिकीचा रिमेक असलेला हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. या चित्रपटामुळे श्रद्धाला एक नवी ओळख मिळाली होती. या चित्रपटात ती अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत झळकली होती. श्रद्धा कपूर शिक्षण- श्रद्धा कपूर एक गुणी विद्यार्थिनी होती. तिने आपलं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘जमनाबाई नरसी स्कुल’मधून घेतलं आहे. त्यानंतर तिने ‘अमेरिकन स्कुल ऑफ बॉम्बे’मध्ये प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे या शाळेत टायगर श्रॉफ आणि अथिया शेट्टीनेसुद्धा शिक्षण घेतलं आहे. याठिकाणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रद्धा उच्चशिक्षणासाठी बॉस्टनला गेली होती. तिने मानसशास्त्र हा विषय निवडला होता. तिला मानसशास्त्रात काहीतरी करण्याची इच्छा होती. परंतु बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने आपली डिग्री अर्धवट सोडली होती. ‘तीन पत्ती’ या आपल्या डेब्यू चित्रपटासाठी तिने शिक्षण सोडलं होतं. **(हे वाचा:** Celebes Education: अभिनेता बनण्यापूर्वी ‘या’क्षेत्रात होता कार्तिक आर्यन; तुम्हाला माहितेय का अभिनेत्याचं शिक्षण? ) अभिनयाचा वारसा श्रद्धा कपूरला आपल्या घरातूनच मिळाला आहे. ती शाळेत असल्यापासून नाटक आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेत होती. एका नाटकादरम्यान सलमान खानने श्रद्धाला पाहिलं होतं. तिला तिचा अभिनय प्रचंड आवडला होता. अवघ्या सोळाव्या वर्षी श्रद्धा एखाद्या तरबेज अभिनेत्रीसारखा अभिनय करत होती. ते पाहून सलमानने तिला ‘लकी’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र शिक्षण पूर्ण करण्यासाठी तेव्हा तिने ही ऑफर नाकारली होती. परंतु शेवटी श्रद्धाने सिनेसृष्टीतच आपलं करिअर केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात