जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Celebes Education: अभिनेता बनण्यापूर्वी 'या'क्षेत्रात होता कार्तिक आर्यन; तुम्हाला माहितेय का अभिनेत्याचं शिक्षण?

Celebes Education: अभिनेता बनण्यापूर्वी 'या'क्षेत्रात होता कार्तिक आर्यन; तुम्हाला माहितेय का अभिनेत्याचं शिक्षण?

Celebes Education: अभिनेता बनण्यापूर्वी 'या'क्षेत्रात होता कार्तिक आर्यन; तुम्हाला माहितेय का अभिनेत्याचं शिक्षण?

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या क्युट लुक्सने अभिनेत्यानं तरुणींना अक्षरशः वेड लावलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट-  बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या क्युट लुक्सने अभिनेत्यानं तरुणींना अक्षरशः वेड लावलं आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. फारच कमी वेळेत कार्तिकनं प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. परंतु तुम्हाला माहितेय का अभिनेता बनण्यापूर्वी कार्तिक कोणत्या क्षेत्रात कार्यरत होता? आणि त्यानं नेमकं कोणतं शिक्षण घेतलंय? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. हॅन्ड्सम हंक बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा जन्म 22 नोव्हेंबर 1988 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर याठिकाणी एका सुशिक्षित कुटुंबात झाला आहे. त्याचे वडील डॉ. मनीष तिवारी हे एक बालरोगतज्ञ आहेत. आणि आई डॉ. माला तिवारी या एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. कार्तिकची बहीण कृतिका तिवारीदेखील एक डॉक्टर आहे. परंतु कार्तिक आर्यनला लहानपणापासूनच अभिनयात प्रचंड रस होता. तरीसुद्धा अभिनेत्यानं शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता उच्चशिक्षण घेतलं आहे.

News18

कार्तिक आर्यनच्या शालेय शिक्षणापासून सुरुवात करायची तर, अभिनेत्यानं किडीज स्कूल आणि ग्वाल्हेर सेंट पॉल स्कुलमधून शिक्षण घेतलं आहे. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून म्हणजेच अकरावीत असल्यापासून कार्तिकनं आपल्या अभिनय करिअरकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली होती.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्तिक आर्यन मुंबईला शिफ्ट झाला होता. महत्वाचं म्हणजे अभिनेत्यानं नवी मुंबईमधील डी. वाय. पाटील कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बी टेकची पदवी मिळवली आहे. अर्थातच कार्तिक केवळ एक अभिनेता नसून इंजिनियरसुद्धा आहे. आज तो अभिनय क्षेत्रात नसता तर या क्षेत्रात कार्यरत असता. कार्तिकच्या अभिनय क्षेत्रात येण्याचा किस्सासुद्धा रंजक आहे. दिग्दर्शक लव रंजन यांनी कार्तिक आर्यनला फेसबुकवर पाहिलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी ‘प्यार का पंचनामा’मध्ये कार्तिकची निवड केली होती. चित्रपटात वर्णी लागल्यामुळं अभिनेत्यानं आपल्या तिसर्‍या वर्षात अभियांत्रिकीचं शिक्षण  सोडून दिलं होतं. मात्र, नंतर अभिनेत्यानं अंतिम परीक्षा देऊन पदवी मिळवली होती.विशेष म्हणजे 2015 मध्ये ‘प्यार का पंचनामा’चा सिक्वेलही रिलीज झाला होता. या चित्रपटामुळे कार्तिक चर्चेत आला होता. **(हे वाचा:** आजोबांच्या कडेवर बसलेला हा चिमुकला आज आहे बॉलिवूड स्टार; तुम्ही ओळखलं का या हॅन्ड्सम हंकला? ) मॉडेलिंग क्षेत्रात केलंय काम- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एक यशस्वी मॉडेलदेखील आहे. त्यानं विविध ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. कार्तिकने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. सिनेसृष्टीशी निगडित कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना कार्तिक आज यशाच्या शिखरावर आहे. परंतु सुरुवातीला त्याच्याकडे काम मिळवण्यासाठी कोणताच स्रोत नव्हता. तसेच कार्तिक आपला पहिला चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ च्या शूटिंग दरम्यान आपल्या 12 रुममेट्ससह 2 BHK फ्लॅटमध्ये राहात होता. अभिनेता सतत आपल्या मुलाखतींमध्ये या आठवणींना उजाळा देत असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात