श्रद्धा कपूरनं अस्सल मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला तीन पिढ्यांचा Photo

श्रद्धा कपूरनं अस्सल मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला तीन पिढ्यांचा Photo

श्रद्धा कपूर ही मराठी नसली तरीही तिला मराठी उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येतं.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : आज मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा. पण यंदा या सणाला कोरोना व्हायरसचं ग्रहण लागलं आहे. देशभरात पुढच्या 21 दिवसांसाठी लॉकडाउन असल्यानं सर्वांना री राहावं लागत आहे. संपूर्ण जग चिंतेत असताना या गुढीपाडव्याला सर्वजण या संकटावर मात करण्याचा निर्धार कराताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री श्रद्धा कपूरची सोशल मीडिया पोस्ट मात्र खूप व्हायरल होताना दिसत आहे.

श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यात श्रद्धासोबतच तिची आई आणि आजी सुद्धा दिसत आहेत. हा फोटो शेअर करत श्रद्धानं सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ज्यातून तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत. कारण श्रद्धानं दिलेल्या शुभेच्छा खूप खास आहेत. कारण श्रद्धानं सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा चक्क अस्सल मराठीमध्ये दिल्या आहेत.

उर्वशी रौतेलानं शेअर केला HOT VIDEO, सोशल मीडियावर बिकिनी लुकची चर्चा

तीन पीढ्यांचा एकत्र असा ब्लॅक अँड व्हाइट कोलाज फोटो शेअर करत श्रद्धानं लिहिलं, पिढ्यानपिढ्या जपलेला पेहराव...साडी

पिढ्यानपिढ्या उभारलेला सन्मान...गुढी, पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा... गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या फोटोमध्ये श्रद्धा सुद्धा परफेक्ट मराठमोळ्या लुकमध्ये दिसत आहे.

होम क्वारंटाईनमध्ये टायगर नाही तर या खास व्यक्तीला वेळ देतेय दिशा पाटनी!

श्रद्धा कपूर ही मराठी नसली तरीही तिला मराठी उत्तम लिहिता, वाचता आणि बोलता येतं. कारण तिची आई मराठी आहे. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लव्ह मॅरेज केलं आहे. दोघांच्याही घरून लग्नाला विरोध असल्यानं त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. पण नंतर सर्व काही ठिक झालं. आई मराठी असल्यानं श्रद्धा उत्तम मराठी बोलते अनेकदा तिच्या पोस्टमधून याचा प्रत्यय सर्वांना येत असतो.

कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट

First published: March 25, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading