जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / North Korea Nuclear Test : उत्तर कोरियाच्या एका निर्णयाने अमेरिका नरमली; शत्रुत्व सोडून डायरेक्ट चर्चेसाठी तयार

North Korea Nuclear Test : उत्तर कोरियाच्या एका निर्णयाने अमेरिका नरमली; शत्रुत्व सोडून डायरेक्ट चर्चेसाठी तयार

North Korea Nuclear Test : उत्तर कोरियाच्या एका निर्णयाने अमेरिका नरमली; शत्रुत्व सोडून डायरेक्ट चर्चेसाठी तयार

US On North Korea Nuclear Test : काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आपला नेता किम जोंग उन यांच्या देखरेखीखाली लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की किम येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत अणुचाचणी करू शकतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 26 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांपासून उत्तर कोरिया या देशानं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. उत्तर कोरियाची जगातील सर्वांत रहस्यमयी देशांमध्ये गणना केली जाते. तेथील सरकारनं मीडिया आणि इंटरनेटवर कडक निर्बंध घातल्यामुळे देशात काय चाललं आहे, तेथील परिस्थिती काय आहे याची माहिती सरकारच्या इच्छेशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. आता असं मानलं जातं आहे, की उत्तर कोरिया अण्वस्र चाचणीची तयारी करत आहे. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनं कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सोमवारी (24 ऑक्टोबर 22) याबाबत माहिती दिली. योनहाप वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रेस सेक्रेटरी नेड प्राइस यांनी सांगितलं की, अमेरिका प्योंगयांगशी (उत्तर कोरियाची राजधानी) म्हणजेच कोरियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. नेड प्राइस यांनी एका दैनिक पत्रकार परिषदेत उत्तर कोरियाचा ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ (डीपीआरके) असा उल्लेख करत या प्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले, “उत्तर कोरिया आपली सातवी अणुचाचणी करण्याच्या तयारीत आहे. काही काळापासून आम्हाला या गोष्टीची काळजी वाटत आहे. डीपीआरके या चाचणीसाठी पुंगे-री येथील टेस्टिंग साइटवर कशा प्रकारे तयारी करत आहे, याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही जगभरातील आमच्या सहकारी राष्ट्रांशी समन्वय साधून कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करत आहोत.” वाचा - बांग्लादेशमध्ये ‘सितरंग’ चक्रीवादळाचा कहर, 5 जणांचा मृत्यू; भारतालाही पावसाचा… अमेरिका चर्चेसाठी तयार नेड प्राइस यांनी, अमेरिका उत्तर कोरियाशी संवाद साधण्यासाठी तयार असल्याचाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “आम्ही सातत्याने स्पष्ट केलं आहे की डीपीआरकेबद्दल आमच्या मनात शत्रूत्त्वाची भावना नाही. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. असं असलं तरीही, आमच्या कर्मचार्‍यांचं आणि सहयोगी राष्ट्रांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

    News18लोकमत
    News18लोकमत

    उप-परराष्ट्रमंत्र्यांचा जपान दौरा अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन जपान दौऱ्यावर आहेत. तिथे ते दक्षिण कोरिया आणि जपानच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर कोरियाबाबतची आपली भूमिका मांडली आहे. नेड प्राइस म्हणाले, “अमेरिकेकडून उचलल्या जाणार्‍या पावलांमध्ये संरक्षण स्थितीत अ‍ॅडजस्टमेंट होऊ शकते. उप-परराष्ट्रमंत्र्यांच्या जपान दौऱ्यात उत्तर कोरियाशी संबंधित आव्हानांवर चर्चा होईल.”

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात