मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं मुंबई क्राइम ब्रांचला दिली 25 लाखांची लाच, आरोपीकडून मोठा खुलासा

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं मुंबई क्राइम ब्रांचला दिली 25 लाखांची लाच, आरोपीकडून मोठा खुलासा

Raj Kundra gave 25 lakhs Bribe:  राजला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता नवीन अपडेट येत आहेत. या प्रकरणातल्या आरोपीनं एक मोठा खुलासा केला आहे.

Raj Kundra gave 25 lakhs Bribe: राजला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता नवीन अपडेट येत आहेत. या प्रकरणातल्या आरोपीनं एक मोठा खुलासा केला आहे.

Raj Kundra gave 25 lakhs Bribe: राजला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता नवीन अपडेट येत आहेत. या प्रकरणातल्या आरोपीनं एक मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 22 जुलै: शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी (Porn Case) प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. राजला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता नवीन अपडेट येत आहेत. या प्रकरणातल्या आरोपीनं एक मोठा खुलासा केला आहे. राज कुंद्रानं अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राइम (Mumbai Crime Branch) ब्रांन्चला 25 लाख रुपयांची लाच दिली असल्याचा दावा या प्रकरणातल्या आरोपीनं केला आहे. (Raj Kundra gave 25 lakhs Bribe to Mumbai Crime Branch)

मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणात अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूर सुद्धा आरोपी आहे. त्यानं ईमेल द्वारे मार्च महिन्यात एसीबीला याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात एसीबीनं ही तक्रार मुंबई पोलीस कमिश्नरच्या ऑफिसमध्ये पाठवली होती. दरम्यान शहरातील पोलीस अधिकारी यावर काहीच भाष्य करायला तयार नाहीत. बुधवारी क्राइम ब्रांन्चनं राज कुंद्राच्या अंधेरीतील ऑफिसमध्येही छापा टाकला होता.

अरविंद श्रीवास्तव याची फ्लिज मूव्हीज नावाची कंपनी होती. याआधी या कंपनीचं नाव न्यूफ्लिक्स असं होतं. ही अमेरिकेतील एक कंपनी आहे. या कंपनीद्वारे मार्चमहिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मार्चमध्ये पोलिसांनी या कंपनीला नॉमिनेट केलं होतं आणि कंपनीचा मालक अरविंद श्रीवास्तव याचे दोन बँक अकाऊंट सीज केले होते. या बँक अकाऊंटमध्ये 4.5 कोटी रुपये होते. ईमेलमध्ये न्यूफ्लिक्सनं दावा केला आहे की, पोलिसांच्या एका खबरीनं कंपनीकडून 25 लाख रुपयांची मागणी केली होती.

दारात नाहीतर रस्त्यावरच्या खड्ड्यांभोवती महिलांनी काढली रांगोळी, बघा PHOTOS

राज कुंद्रा विरोधात सापडला मोठा पुरावा

राज आणि त्याचा बिझनेस पार्टनर उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान क्राईम ब्रांचनं उमेशच्या ऑफिसवर छापा मारला. (Mumbai Police raid on Umesh Kamat's Office) यामध्ये तब्बल 70 अश्लील व्हिडिओ त्यांच्या हाती लागले आहेत. हे व्हिडिओ विविध प्रोडक्शन हाऊसने त्यांना पाठवले होते.

राज कुंद्रा आणि उमेश कामत हॉटशॉट नावाचा एक वेब सीरिज अॅप चालवत होते. यावर आतापर्यंत 90 व्हिडीओज शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 30 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील दृश्य आहेत. अर्थात हे पॉर्न व्हिडीओ नाहीत असा दावा वारंवार राज कुंद्रा करत आहे. चौकशीदरम्यान युकेमधील केनरिन कंपनीसोबत त्याचे व्यवसायिक संबंध असल्याचं त्याने मान्य केलं. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पॉर्न व्हिडीओंची निर्मिती केलेली नाही असं तो वारंवार सांगतोय. तो केवळ एरॉटिक बोल्ड सीरिजची निर्मिती करत होता असा त्याचा दावा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Video: हे बघाच! हा तबेला नव्हे रस्ता आहे, रस्त्यावर म्हशींची तोबा गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.

First published:

Tags: Bollywood, Raj kundra, Shilpa shetty