प्रविण तंडेकर, प्रतिनिधी
गोंदिया, 07 जून : गोंदियामध्ये दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वैनगंगा नदीपात्रात पोहोण्यासाठी हे दोघे मित्र गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही एकावेळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बदलत्या हवामानामुळे आणि चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्व नदीपात्र भरली आहेत. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये एकाला वाचवण्यात यश आलं असून दुसऱ्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात कवलेवाडा गावाजवळ असलेल्या नदीमध्ये अंघोळीला तिघे मित्र अंघोळीला गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघं पाण्यात बुडाली.
शेतात झोपलेल्या बाप-लेकाच्या अंगावर गेला जेसीबी, डोळ्यांदेखत वडिलांनी गमावला जीव
नाका, तोंडात पाणी गेल्यामुळे आणि श्वास घेता न आल्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकाला वाचवण्यात आलं आहे.
मृतक हे तिरोडा तालुक्यातील काचेवानी इथल्या रेल्वे वसाहतीमधील रहिवासी असून मृतांमध्ये सोना चल राठोड (वय 21वर्ष) आणि उमंग शिरसागर (वय 18 वर्ष) या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर भरत जांभूळकर व 19 वर्ष हा मुलगा बचावलेला आहे. स्थानिकांकडून तात्काळ पोलिसांनी प्राचारण करण्यात आलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गर्भवती महिलेला 8 रुग्णालयांनी दिला नकार, 13 तासांनी रुग्णवाहिकेतच झाला मृत्यू
पोलिसांनी नदीपात्रातून दोघांचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या सामान्य रुग्णालय तिरोडा इथे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. आपल्या दोन मित्रांना अशा प्रकारे गमावल्यामुळे इतर मित्रांमध्ये शोककळा पसरली आहे.
डाळभातावरून दोघांची केली हत्या, 6 गाड्या बदलून आरोपी मुंबईहून पुण्यात
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.