मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहिद कपूरच्या पत्नीसोबत Online fraud; ऑर्डर केलं कव्हर अन् आलं भलतंच काही...

शाहिद कपूरच्या पत्नीसोबत Online fraud; ऑर्डर केलं कव्हर अन् आलं भलतंच काही...

मिरानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या फ्रॉडची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

मिरानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या फ्रॉडची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

मिरानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या फ्रॉडची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

मुंबई 9 जुलै: गेल्या काही काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online fraud) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अगदी सर्वसामान्य ग्राहकांपासून नामांकित सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ऑनलाईन फसवणुकीचा अनुभव घेतला आहे. सध्या अशीच फसवणुक शाहिद कपूरची पत्नी मिरा राजपूत (Mira Rajput) हिच्यासोबत देखील झाली. तिनं आपल्या मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. (Fake mobile cover) परंतु त्याऐवजी तिला दुसरंच काहीतरी पाठवण्यात आलं. मिरानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या फ्रॉडची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

मिरानं आपल्या आयफोनसाठी एक महागडं कव्हर ऑर्डर केलं होतं. तिनं त्यासाठी ऑनलाईन पेमेंट देखील केलं. परंतु तिच्यासोबत फसवणूक करण्यात आली. तिनं जो फोटो पाहून कव्हर ऑर्डर केलं होतं त्याऐवजी तिला दुसऱ्याच प्रकारचं कव्हर पाठवण्यात आलं. शिवाय या कव्हची क्वालिटी देखील खूपच खराब आहे. तळाला त्याला एक भोक देखील पडलं आहे. अन् हे भोक बुझवण्यासाठी चक्क स्टिकर लावण्यात आला आहे. हा प्रकार पाहून मिरा संतापली अन् तिनं आपला सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला.

उर्वशीला नडला मोबाईलचा अतिवापर; या व्याधीसाठी अखेर करावं लागलं ऑपरेशन

शत्रुघ्न सिन्हांनी प्रेयसीला धावत्या ट्रेनमध्ये केलं होतं प्रपोज; पाहा शॉटगनची थ्रीलिंग Love story

मिरानं इन्स्टाग्रामवर या कव्हरचे फोटो शेअर करत ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अनेकांनी तिला या फसवणूक करणाऱ्या वेब सईटचं नाव विचारलं परंतु अद्याप तिने सांगितलेलं नाही. शिवाय काही जणांनी तिला सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Online fraud, Shahid kapoor, Shahid Kapoor-Mira Rajput