उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; राज कुंद्रा विरोधात सापडला मोठा पुरावा

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; पोलिसांच्या हाती लागली मोठी सामग्री

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; पोलिसांच्या हाती लागली मोठी सामग्री

  • Share this:
    मुंबई 22 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography case) राज आणि त्याचा बिझनेस पार्टनर उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान क्राईम ब्रांचनं उमेशच्या ऑफिसवर छापा मारला. (Mumbai Police raid on Umesh Kamat's Office) यामध्ये तब्बल 70 अश्लील व्हिडीओ त्यांच्या हाती लागले आहेत. हे व्हिडीओ विविध प्रोडक्शन हाऊसने त्यांना पाठवले होते. राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का राज कुंद्रा आणि उमेश कामत हॉटशॉट नावाचा एक वेब सीरिज अॅप चालवत होते. यावर आतापर्यंत 90 व्हिडीओज शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 30 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील दृश्य आहेत. अर्थात हे पॉर्न व्हिडीओ नाहीत असा दावा वारंवार राज कुंद्रा करत आहे. चौकशीदरम्यान युकेमधील केनरिन कंपनीसोबत त्याचे व्यवसायिक संबंध असल्याचं त्याने मान्य केलं. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पॉर्न व्हिडीओंची निर्मिती केलेली नाही असं तो वारंवार सांगतोय. तो केवळ एरॉटिक बोल्ड सीरिजची निर्मिती करत होता असा त्याचा दावा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. शर्लिन चोप्रा करायची राज कुंद्रासाठी पॉर्नोग्राफी; का थांबवला बिझनेस? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
    Published by:Mandar Gurav
    First published: