मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच शिल्पा पतीसोबत स्पॉट; मीडियाला टाळताना दिसला राज कुंद्रा

VIDEO: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच शिल्पा पतीसोबत स्पॉट; मीडियाला टाळताना दिसला राज कुंद्रा

दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर बराच संघर्ष करून राज कुंद्राला जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राला पत्नी शिल्पा शेट्टीसोबत पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर बराच संघर्ष करून राज कुंद्राला जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राला पत्नी शिल्पा शेट्टीसोबत पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर बराच संघर्ष करून राज कुंद्राला जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राला पत्नी शिल्पा शेट्टीसोबत पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर : पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोपी असणारा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योजक (businessman) राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या जामीनावर (bail) बाहेर आहे. पॉर्नोग्राफिक फिल्मची ( films ) निर्मिती करून काही अ‍ॅपच्या माध्यमातून त्याचे प्रसारण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पॉर्न व्हिडिओ प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 2 महिने तुरुंगात राहिल्यानंतर बराच संघर्ष करून राज कुंद्राला जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राला पत्नी शिल्पा शेट्टीसोबत पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसत होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राज पहिल्यांदा कारमधून बाहेर येतो व मीडियाला टाळत थेट विमानतळाच्या आत जातो.त्याचवेळी राज कुंद्रा विमानतळाच्या आत जाईपर्यंत शिल्पा तिच्या कारमधून उतरत नाही. राज विमानतळावर प्रवेश करताच शिल्पा कारमधून बाहेर आली. शिल्पाही मीडियाशी न बोलता विमानतळाच्या आत जाते. आता या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा :स्वरा भास्कर लवकरच आई होणार ! म्हणते, 'मी आता जास्त वाट पाहू शकत नाही'

अलीकडेच शिल्पा शेट्टीने तिच्या लग्नाच्या 12 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि राजच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते आणि राज कुंद्राच्या नावाने एक सुंदर संदेश देखील लिहिला होता. शिल्पा शेट्टीने लिहिले होते की, '12 वर्षांपूर्वीचा हा क्षण. आम्ही एकमेकांना वचन दिलं की आम्ही चांगल्या आणि वाईट काळात एकत्र राहू. आजही आम्ही हे वचन पूर्ण करत आहोत. आमचा प्रेमावर विश्वास असून देव सुद्धा आम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतो. 12 वर्षे आणि पुढे मोजत नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… आणि आनंद, माइलस्टोन आणि आमची सर्वात मौल्यवान मालमत्ता…आमच्या मुलांसाठी..' असे लिहितानाच शिल्पाने पुढे म्हटले आहे की, 'त्या सर्व लोकांचे खूप खूप आभार ज्यांनी कायम चांगल्या-वाईट काळात आम्हाला साथ दिली.' शिल्पाने या पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची सिल्कची साडी आणि दागिने घातलेले दिसत आहे. तर, राजने शिल्पाच्या आउटफिटसोबत मॅचिंग शेरवानी आणि सेहरा घातला आहे.

दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज प्रसिद्धीपासून दूर आहे. यासोबतच त्याने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत. काही दिवसांपासून तो त्याचे खासगी आयुष्य जगत आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा याने शिल्पासोबत हिमाचलला जाऊन तेथील अनेक मंदिरांमध्ये जात दर्शन घेतले. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तर राज तुरुंगात असताना शिल्पा त्याच्यासाठी वैष्णोदेवी येथे प्रार्थना करण्यासाठी गेली होती. काही दिवसांपूर्वी राज तुरुंगातून बाहेर आला आहे.

वाचा :VIDEO :मानसी नाईकला चुलीवर चपाती बनवताना पाहून चाहत्याला झाली बायकोची आठवण...

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 22 नोव्हेंबर 2009 रोजी विवाहबद्ध झाले. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी एकमेकांना पूरक आहेत आणि अनेकदा एकत्र दिसतात. मात्र, राजची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ती अनेक प्रसंगी राज कुंद्राशिवाय दिसली आहे. शिल्पा शेट्टी सध्या राजसोबत फोटो शेअर करणे किंवा सार्वजनिकरित्या स्पॉट होण्याचे टाळत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Raj kundra, Shilpa shetty