मुंबई, 18 मे : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या लॉकडाऊनमध्ये तिच्या फॅमिलीला वेळ देत आहे. या दरम्यान ती सोशल मीडियावरही तेवढीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिल्पा सतत तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते. तिचे धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. आताही तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्याच तिचा नवरा तिला चिडवून एकटाच आइस्क्रीम खाताना दिसत आहे. पण यावर शिल्पानं जे केलं ते पाहिल्यावर सर्वच हैराण झाले आहेत. शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे टिकटॉक व्हिडीओ शेअर करत असते. कधी नव्हे ते शिल्पाचा नवरा सुद्धा टिकटॉकवर खूप सक्रीय आहे. या व्हिडीओेमध्ये या दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. नुकताच तिनं एक व्हिडीओे शेअर केला आहे. ज्यात तिचा नवरा राज कुंद्रा तिला चिडवून आइस्क्रीम खाताना दिसत आहे. शिल्पा त्याच्याकडे आइस्क्रीम मागते पण तो तिला देत नाही. याचा शिल्पाला राग येतो आणि रागाच्या भरात ती त्या आइस्क्रीमवर थुंकते. शिल्पा आणि राज यांचा हा फनी व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे आणि युजर्स यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट…
शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘हंगामा 2 ’ आणि ‘निकम्मा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या कोरोना व्हायरसच्या थैमानमुळे अनेक सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. त्यात शिल्पाचे हे दोन्ही सिनेमा अडकले आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून दूर असलेली शिल्पा आता कमबॅकसाठी तयार झाली आहे. याशिवाय सध्याच्या लॉकडाऊनमध्ये ती तिचा सर्वाधिक वेळ मुलगी समीशासोबत स्पेंड करत आहे. ‘फँड्री’मधल्या जब्याची ‘शालू’ आता झालीय एवढी मॉडर्न, PHOTOS पाहून व्हाल थक्क