जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सुनील शेट्टीनंतर शिल्पानं टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर दिली अशी प्रतिक्रिया; नेटकरी म्हणाले, 'दारुपेक्षा स्वस्तच...'

सुनील शेट्टीनंतर शिल्पानं टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर दिली अशी प्रतिक्रिया; नेटकरी म्हणाले, 'दारुपेक्षा स्वस्तच...'

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्यानंतर आता ‘धडकन’ चित्रपटात अभिनेत्यासोबत काम केलेल्या शिल्पा शेट्टीने टोमॅटोवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20  जुलै : सध्या भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. टोमॅटोचा भाव 100 ते 150 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसांवरच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या किचनवरही होत आहे. काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांना चांगलंच ट्रोल देखील करण्यात आलं. त्यांच्यानंतर आता ‘धडकन’ चित्रपटात अभिनेत्यासोबत काम केलेल्या शिल्पा शेट्टीने टोमॅटोवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका मॉलमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी टोमॅटो उचलून गालाला त्याकडे आश्चर्यानं बघत आहे. तेवढ्यात पार्श्वभूमीवर ‘धडकन’ चित्रपटातील अभिनेत्रीचा संवाद ऐकायला मिळतो. त्यात ‘खबरदार, जो मुझे छुने की कोशिश की. तुम्हारा कोई हक नही मुझपर’ असं शिल्पाला ऐकू येतं. यानंतर शिल्पा शेट्टीने टोमॅटो जागच्या जागी ठेवून देते.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडिओ पोस्ट करत शिल्पा शेट्टीने ‘टोमॅटोची किंमत माझी ‘धडकन’ वाढवत  आहे’ असं म्हटलं आहे. शिल्पाच्या या मजेदार व्हिडिओवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. तर काही नेटकऱ्यांना अभिनेत्रीचा हा व्हिडीओ रुचला नसून त्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. लोकप्रिय अभिनेत्रीनं गमावलं आपलं तान्हुलं बाळ; दुःख सांगत म्हणाली ‘त्या धक्क्यातून सावरायला…’ एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘टोमॅटोच्या किमतीमुळे मध्यमवर्गीय लोकांना खूप फरक पडतो. तुमच्यासारखे श्रीमंत लोकही फरक करतात, हे आज कळले.’ असं म्हटलयं. अशा प्रकारे नेटिझन्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. तर काही जणांनी तिला ‘तुमच्या दारुपेक्षा टोमॅटो स्वस्तच आहे’ असं म्हणत ट्रोल देखील केलं आहे.

जाहिरात

यापूर्वी सुनील शेट्टी यांनी टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी आता टोमॅटोचा खप कमी केल्याचेही सांगण्यात आले. नुकतेच सुनीलने सांगितले की, ‘आमच्या घरी बहुतेक ताज्या भाज्या येतात. आजकाल टोमॅटोचे भाव वाढले आहेत, त्यामुळे आम्ही त्याचे प्रमाण कमी केले आहे. लोकांना वाटेल की याने सेलेब्सना काय फरक पडेल, पण तसे अजिबात नाही. मात्र या वक्तव्यानंतर सुनील शेट्टीला शेतकऱ्यांची माफी मागावी लागली होती. शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टीने 2000 साली ‘धडकन’ चित्रपटात काम केले होते. अक्षय कुमारही या चित्रपटाचा एक भाग होता. मात्र, हा चित्रपट कमाईच्या बाबतीत काही खास दाखवू शकला नाही. सुमारे 10 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ऍव्हरेज कमाई केली. पण यातील गाणी मात्र चांगलीच हिट झाली होती. याशिवाय दोन्ही स्टार्स अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात