टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी मागच्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. 40 वर्षी बॉयफ्रेंड शलभ डांगशी दुसरं लग्न करत आहे. हे दोघंही 10 फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
काम्या पंजाबीच्या लग्नाचं सेलिब्रेशन सुरु झालं असून नुकताच या दोघांनी साखरपुडा उरकला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
काम्या आणि शलभच्या साखरपुड्याचा कार्यक्रम गुरुद्वारामध्ये पार पडला. देवाचे आशीर्वाद घेऊन मग या दोघांनी एकमेकांना अंगठी घातली.
यावेळी शलभ निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. तर काम्यानं गोल्डन ब्लॅक शरारा आणि दुपट्टा परिधान केला होता.
10 फेब्रुवारीला लग्न आटोपल्यानंतर 11 फेब्रुवारीला हे कपल ग्रँड रिसेप्शन देणार आहेत. याशिवाय दिल्लीमध्येही एक रिसेप्शन होणार आहे.
काम्यानं लग्नाच्या विधी सुरू करण्यापूर्वी तिच्या घरी ‘माता चौकी’चंही आयोजन केलं होतं. देवाला साक्षी ठेवून या दोघांनी लग्नाच्या विधीला सुरुवात केली आहे.
काम्या आणि शलभनं मागच्या वर्षी 10 फेब्रुवारीला एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यानं काम्याला लग्नासाठी प्रपोज केलं.