मुंबई, 17 जुलै- बॉलिवूड कलाकारांची ‘लाईफस्टाईल’ हा चाहत्यांसाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय आहे. कलाकरांच्या कार, कपडे, बंगला,ज्वेलरी अशा एक ना कित्येक गोष्टी चर्चेत असतात. यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेलेब्रेटींची ‘व्हॅनिटी व्हॅन’ होय. या सेलेब्रेटींच्या व्हॅनिटी एखाद्या आलिशान फ्लॅटसारख्या असतात. नुकतंच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक नवी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. या व्हॅनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच थक्क होत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत असतात. रात्री उशिरा शूटिंगनंतर सकाळी लवकर सेटवर पोहोचायचे असेल तर टाइम मॅनेजमेंट करत व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करुन वेळ घालवणे स्टार्सना नेहमीच आवडतं. शिल्पा अभिनयासोबतच तिच्या लग्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखली जाते. फिटनेस फ्रिक असणाऱ्या या अभिनेत्रीकडे स्टायलिश कपड्यांसोबतच कारचंही जबरदस्त कलेक्शन आहे.नुकताच तिच्या नवीन व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडीओ समोर आला आहे. आता शिल्पा तिच्या नवीन व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत आहे. ही व्हॅनिटी तिने काही दिवसांपूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःला गिफ्ट केली होती. चाहत्यांना शिल्पाच्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचं होतं. नुकतंच अभिनेत्रीच्या या व्हॅनच्या आतील एक झलक समोर आली आहे.ही व्हॅनिटी एखाद्या आलिशान अपार्टमेंटसारखी आहे. नेटकरी त्याला वन बीएचकेपेक्षा आलिशान असल्याचं म्हणत आहेत.
**(हे वाचा:** Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूने सोशल मीडियाला केलं रामराम? या कारणामुळे चर्चांना उधाण ) ही व्हॅनिटी व्हॅन पाहिल्यानंतर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की ही व्हॅन आहे. या व्हॅनिटीमध्ये मीटिंग रूम, 2-2 वॉशरूम, प्रायव्हेट चेंबर, आलिशान किचन, आलिशान बेड, कपड्यांसाठी अतिशय सुंदर कपबर्ड आणि योगासाठी योगा डेस्कदेखील उपलब्ध आहे. शिल्पाची व्हॅनिटी व्हॅन प्रत्येक गोष्टीने सुसज्ज आहे या व्हॅनिटीवरुन पुन्हा एकदा चाहत्यांना शिल्पाच्या रॉयल लाईफस्टाईलचा अंदाज येत आहे.