मुंबई, 10 मे : बॉलिवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रींमधील कॅट फाइटच्या चर्चा नेहमीच कानावर पडत असतात. एकाच सिनेमात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या दोन अभिनेत्रीमध्ये भाडणं असल्याच अनेकदा ऐकायला मिळतं. नुकताच बॉलिवूड अभिनेत्रींमधील एक नव्या भांडणाचा खुलासा झाला. मात्र या अभिनेत्रीची नावं ऐकल्यावर कोणालाही याविषयी खरं वाटणार नाही. अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी यांच्यामध्ये भांडण होतं असा खुलासा स्वतः शिल्पानं नुकत्याच एका शो दरम्यान केला. शिल्पा शेट्टी आणि काजोल यांनी शाहरुख खानसोबत ‘बाजीगर’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. ज्यात या दोघींनी बहिणींची भूमिका साकरली होती. मात्र या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घटलेल्या एका घटनेमुळे या दोघींमध्ये कायमचा दुरावा आला. एवढचं नव्हे तर मोठ्या पडद्यावर एकमेकांच्या बहिणी असलेल्या या दोघी रिअल लाइफमध्ये एकमेकींचं तोंडही पाहत नव्हत्या. बाजीगर मधून शिल्पानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तसेच या सिनेमासाठी तिनं खूप मेहनतही घेतली होती. ‘सुपर डान्सर 3’ या डान्स शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहत असलेल्या शिल्पानं 1993मध्ये आलेल्या तिच्या ‘बाजीगर’ सिनमाविषयीचा एक किस्सा या शो दरम्यान शेअर केला. ती म्हणाली, ‘मी या सिनेमाचे निर्माते आणि काजोलवर त्यावेळी खूप रागावले होते.’ या सिनेमातील सुपरहिट गाणं ‘काली काली आखें’चं शूटिंग काजोलला घेऊन करण्यात आलं. मात्र हे गाणं आपल्या डेब्यू फिल्ममध्ये आपल्यावरच चित्रित व्हावं असं शिल्पाला वाटत होतं.
शिल्पा पुढे म्हणाली, या गण्याचे बोल आणि काजोलच्या डोळ्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. तरीही या गाण्यासाठी काजोलला निवडण्यात आलं होतं. यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं. पण हे गाणं जेव्हा सुपरहिट झालं तेव्हा त्याचं मला अजूनच वाईट वाटलं. त्यावेळी मीडियानंही या दोघींमध्ये कॅटफाइट असल्याची सांगितलं होतं. मात्र आता या दोघींमध्ये चांगले असून शिल्पा आता ही कॅट फाइट मजेशीर अंदाजात घेताना दिसते. आमिर खानची मुलगी झाली 21 वर्षांची, ‘हे’ आहेत तिचे कधीही न पाहिलेले फोटो अब्बास मस्तान यांचं दिग्दर्शन असलेला ‘बाजीगर’ हा सिनेमा 1993मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात शाहरुख खान नकारात्मक भूमिकेत दिसला होता. त्यावेळी म्यूझिक पासून ते कथेपर्यंत सर्वच बाबतीत हा सिनेमा सुपरहिट ठरला. आजही या सिनेमातील गाण्यांना लोकांना आवडतात. ‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू माधुरी नाही तर मेहुणीमुळे तुटलं संजय दत्तचं पहिलं लग्न
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.