• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Pornography प्रकरणी Sherlyn-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय

Pornography प्रकरणी Sherlyn-पूनमला कोर्टाचा दिलासा; दिला महत्त्वाचा निर्णय

आज कोर्टात राज कुंद्राबाबतही सुनावणी केली जाणार होती. परंतु न्यायमूर्ती गैरहजर असल्यामुळे ही सुनावणी होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

 • Share this:
  मुंबई 27 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. (Raj Kundra Pornography case) त्यामुळे राजच्या व्यवसायांविरोधात सतत विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांची नाव देखील चर्चेत होती. यापैकी शर्लिनला चैकशीसाठी क्राईम ब्रांचने समन्स देखील पाठवलं होतं. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींनी मुंबई उच्च न्यायालयाचे (High Court of Bombay) दरवाजे ठोठावले. अन् अटकपूर्व जामिन मिळवला. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. अमोल पालेकर आणि बरुण सोबतीसह स्क्रीन शेअर करणार रिंकू राजगुरु; 100 नंतर दिसणार 200 मध्ये! आज कोर्टात राज कुंद्राबाबतही सुनावणी केली जाणार होती. परंतु न्यायमूर्ती गैरहजर असल्यामुळे ही सुनावणी होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे कोर्टाचे नवे आदेश मिळेपर्यंत आणखी काही काळ राजला पोलिसांच्या ताब्यातच राहावं लागणार आहे. HBD: 7 वर्षांच्या करिअरमध्ये क्रिती सेनन झाली इतक्या कोटींची मालकीण शर्लिन चोप्राचं प्रकरण नेमकं आहे तरी काय? शर्लिनने राजसोबत जवळपास 15 ते 20 पॉर्न आणि सेमी पॉर्न प्रोजेक्ट केले आहेत. प्रत्येक प्रोजेक्टसाठी तिने 30 लाख रुपयांचा करार केला होता. परंतु काही चित्रपटानंतर त्याने पैसे देण्यास आढेवेढे केले. त्यामुळे शर्लिनने राजसोबत काम करण्यास नवकार दिला. इतकेच नाही तर तिने या प्रकरणी पोलीस तक्रार देखील केली होती. राजने तिची तिची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार तिने केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर काहीच दिवसात अशीच तक्रार अभिनेत्री पूनम पांडे हिने देखील केली होती. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शर्लिनची चौकशी केली जाणार आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: