अभिनेत्री क्रिती सेनन हे नाव आता बॉलिवूडसाठी नवं राहीलं नाही. हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सेनन आता लाखो चाहत्यांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. क्रितीच्या वाढदिवसानिमित्त पाहा तिच्या खास गोष्टी.
क्रिती सेनन एक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री ठरत आहे. तसेच क्रिती सेनन अनेक महागड्या वस्तूंची मालकिनही आहे.
क्रिती सेननला इतर अभिनेत्यांप्रमाणेच कार कलेक्शनच्या शौक आहे. क्रितीकडे BMW, Audi यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.
चित्रपटांव्यतिरिक्त क्रितीकडे अनेक ब्रँड एन्डॉर्समेंट्स आहेत. तर एका जाहीरातीसाठी ती एका रिपोर्टनुसार २० लाखांहून अधिक रुपये घेते.
क्रिती सेननचा स्वतःचा एक क्लॉथिंग ब्रँड देखील आहे. मिस टेकन या कपड्यांच्या ब्रँडची मार्केट व्हॅल्यु ही कोटींच्या घरात आहे.
सध्या क्रितीच्या हातात अनेक चित्रपट आहेत. एका रिपोर्टनुसार क्रिती एका चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपये घेते. तर तिची वार्षिक कमाई ही ५ ते ६ कोटी रुपयांच्या घरात आहे.
क्रितीला महागड्या ड्रेसेसचा, बॅग्स आणि गाड्यांचाही शौक आहे. अनेकदा ती महागड्या ड्रेसेसमध्ये दिसून येते. तर महागड्या पर्सही कॅरी करताना दिसते.
मुंबईत आणि दिल्लीतही क्रितीचं लॅव्हिश घर आहे. क्रितीची नेटवर्थ ही ५ मिलियन डॉलर्सहून अधिक आहे. म्हणजे जवळपास ३७ कोटी रुपयांच्या घरात.
दिल्लीत जन्म झालेल्या क्रितीने एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पण त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केलं तर नंतर एका साउथ चित्रपटातही झळकली. तर आता ती एक नावजलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.