मुंबई 27 जुलै: अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आता केवळ मराठी पुरतीच मर्यादीत न राहता हिंदीतीलही एक ओळखीचा चेहरा बनत आहे. सैराट चित्रपटापासून आपला प्रवास सुरू करणारी रिंकू त्यांनतर काही चित्रपटांत झळकली. मागील वर्षी ती ‘100’ या बेवसीरिजमध्ये दिसली होती. तर आता ‘200’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता या चित्रपटाला दिग्दर्शित करणार आहेत. तर अभिनेत्री रिंकूसह, अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) आणि बरुण सोबती (Barun Sobati) हे ही दिसणार आहेत. युडली फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांच्या मते चित्रपटाची कथा एका दलित महिलेची असून तिच्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधातील लढा असणार आहे.
Unveiling the power of #200 soon on #ZEE5. A shocking story inspired by true events. pic.twitter.com/X5Gevmc6gK
— ZEE5 (@ZEE5India) July 26, 2021
‘200’ मध्ये साहील खट्टर, इंद्रनिल सेनगुप्ता, उपेंद्र लिमये, सलोनी बात्रा हे देखील दिसणार आहेत. झी5 (Zee5) वर या चित्रपटाचा प्रिमियर होणार आहे. याविषयी झी५च्या हेड निमिशा पांडे म्हणाल्या की, “200 सारखी कथा असणाऱ्या चित्रपटाला झी5 (Zee5) सारखा प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे ती जगापर्यंत पोहोचू शकते. व अशा धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकू शकते.”
HBD: 7 वर्षांच्या करिअरमध्ये क्रिती सेनन झाली इतक्या कोटींची मालकीण; पाहा अभिनेत्रीच्या Luxurious गोष्टीप्रोडक्शनचे सिद्धार्थ आनंद कुमार म्हणाले की, “ही फारच खरी आणि संबधीत गोष्ट आहे जी सागंण गरजेचं होतं. आम्ही नेहमीच समाजाला संदेश देणारे आणि गरज असणारे चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य घटणांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट जातीयवादावर भाष्य करतो. हा चित्रपट उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न निर्माण करतो. आम्हाला आशा आहे की यानंतर या प्रश्नांवर चर्चा घडेल.”