मुंबई, 18 फेब्रुवारी : रंगभूमी असो की मल्टी स्टारर चित्रपट प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना अवाक् करणाऱ्या शेखर सुमन (Shekhar Suman) यांना एक अष्टपैलू अभिनेता म्हटलं जातं. त्यांनी 25 वर्षांपूर्वी ‘उत्सव’ (Utsav) या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्यासोबत काही बोल्ड सीन केले होते. (Shekhar Suman lovemaking scene) हा चित्रपट आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी संधी कशी मिळाली याचा एक गंमतीशीर किस्सा त्यांनी सांगितला आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचा एक रंजक किस्सा सांगितला. ते म्हणाले, उत्सव या माझ्या पहिल्या चित्रपटाचे निर्माता शशी कपूर होते. या चित्रपटासाठी अनेक नव्या अभिनेत्यांनी ऑडिशन दिलं होतं. त्यापैकी मी देखील एक होतो. मला वाटलं नव्हतं या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळेल. परंतु तरी देखील एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी पृथ्वी थिएटरबाहेर जाऊन उभा राहिलो. त्यावेळी शशी कपूर झाडांना पाणी देत होते. त्यांनी मला पाहिलं अन् आतमध्ये बोलावलं. तिथेच उभ्या उभ्याच त्यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली. त्यांना माझा अभिनय आवडला अन् माझी या चित्रपटासाठी निवड झाली. रेखा यांचा मी खूप मोठा फॅन आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात मी त्यांच्या प्रियकाराची भूमिका साकारत होतो हा क्षण माझ्यासाठी स्वप्नवत होता.
अवश्य पाहा - पेडणेकर बहिणींचं BOLD फोटोशूट, स्टनिंग लो कट ब्लाउज-लेहंग्यामुळे भूमी चर्चेत
1884 साली प्रदर्शित झालेल्या उत्ववला प्रेक्षकांना मिश्र प्रतिसाद मिळाला होता. परंतु अनेक समिक्षकांनी शेखर सुमन यांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर त्यांनी रेहगुजर, मानव हत्या, यातना, संसार, पती परमेश्वर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यान त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती त्रिदेव या चित्रपटामुळं. त्यानंतर त्यांची देख भाई देख ही विनोदी मालिकादेखील सुपरहिट ठरली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Rekha, Shekhar suman, Star celebraties