कॉमेडीच्या जगातील या प्रसिद्ध चेहेऱ्यांनी मोठ्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतलं आहे. (फोटो सौजन्यः Instagram/kapilsharma/bharti.laughterqueen)
कपिल शर्माने अमृतसरच्या श्रीराम आश्रम सीनियर सेकंडरी स्कूल आणि हिंदू कॉलेज (अमृतसर) मधून शिक्षण घेतलं आहे. त्याला एपीजी कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या (जालंधर) प्रमुख माजी विद्यार्थ्यांच्या यादीत सामिल केलं गेलं आहे. (फोटो सौजन्य: kapilsharma/Instagram)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन कृष्णा अभिषेकने सेंट लोरन हायस्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. (फोटो सौजन्य: Instagram/krushna30)
किकू शारदाने डॉन बॉस्को स्कूल मुंबईतून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून कॉमर्स डिग्री मिळवली आहे. तसंच त्याने मुंबईतील चेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चमधून MBA केलं आहे. (फोटो सौजन्य:kikusharda/Instagram)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंहने आपलं शालेय शिक्षण अमृतसरच्या एका सरकारी शाळेत घेतलं. त्यानंतर तिने पंजाबच्या बीबीके डीएवी कॉलेज फॉर वुमनमधून बीए डिग्री घेतली आहे. तसंच तिने पंजाब टेक्निकल यूनिव्हर्सिटीमधून हिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. (सौजन्य: @bharti.laughterqueen/instagram)
जाकिर खान 2012 मध्ये कॉमेडी सेंट्रल 'इंडियाज बेस्ट स्टँडअप कॉमेडियन' शो जिंकल्यानंतर प्रसिद्धझोतात आला. तसंच 'ऑन एयर विथ एआयबी' सह काम करत तो प्रसिद्धीस आला. सेंट पॉल हायर सेकंडरी स्कूल इंदोरमधून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. बी.कॉम शिक्षण पूर्ण करण्याआधीच त्याने कॉलेजला जाणं बंद केलं. तो कॉलेज ड्रॉपआउट आहे. (फोटो सौजन्य: Instagram/zakirkhan_208)
कुणाल कामराला ट्विटरवरुन लोकप्रियता मिळाली होती. त्याने 2013 मध्ये आपले जोक्स ट्विट करण्यास सुरुवात केली होती. यावर अनेक पॉझिटिव्ह प्रतिक्रियाही येत होत्या. त्यानंतर त्याने स्वत:चं 'शट अप' कुणाल चॅनेल सुरू केलं. जय हिंद कॉलेजमधून त्याने ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन घेतलं. पण दुसऱ्या वर्षी ते सोडून त्याने प्रसून पांडेच्या अॅड फिल्म प्रोडक्शन हाउस कोरकोइस फिल्म्समध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य: Instagram/kuna_kamra)
सुमोना चक्रवर्तीने लोरेटो कॉन्वेंट स्कूल लखनऊमधून आणि त्यानंतर मुंबई पवईतील हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसंच मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून तिने इकोनॉमिक्समध्ये बीए डिग्री घेतली आहे. (फोटो सौजन्यः Instagram/sumonachakravarti)
यूट्यूबर आणि स्टँडअप कॉमेडियन तन्मय भट कॉमेडी जगातील एक प्रसिद्ध नाव आहे. मुंबईतील सेठ चुन्नीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूलमधून त्याने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला मरीन इंजियनियर व्हायचं होतं, पण कॉमेडियन म्हणून तो पुढे आला. (फोटो सौजन्य: Instagram/tanmaybhat)