मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज कायमचं मुंबई सोडणार? पाहा काय आहे VIRAL व्हिडीओचं सत्य

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज कायमचं मुंबई सोडणार? पाहा काय आहे VIRAL व्हिडीओचं सत्य

 सोशल मीडियावर शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानुसार शेहनाज कायमचं मुंबई सोडण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानुसार शेहनाज कायमचं मुंबई सोडण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानुसार शेहनाज कायमचं मुंबई सोडण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12ऑक्टोबर- 'बिग बॉस'(Bigg Boss) फेम शेहनाज गिल (Shehnaaz Gill) सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla Death) निधनानंतर पूर्णपणे तुटून गेली आहे. सिद्धार्थ गेल्यांनतर शेहनाज सोशल मीडिया, कॅमेरा आणि बाहेरील जगतापापासून लांब होती. आता एका महिन्यापेक्षा अधिक दिवस झाले आहेत. त्यानंतर आता शेहनाज सर्वसामान्य स्थितीत येताना दिसत आहे. ती सध्या आपल्या 'होंसला रख' चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये स्वतःला व्यग्र ठेवत आहे.

" isDesktop="true" id="616667" >

दरम्यान सोशल मीडियावर शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानुसार शेहनाज कायमचं मुंबई सोडण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सीड्नाजचे चाहते मोठ्या प्रमाणात चिंतीत झाले आहेत. मात्र या फक्त अफवा आहेत. हे अजिबात सत्य नाहीय. स्पॉटबॉय आणि मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये कोणतंच तथ्य नाही. हा व्हायरल व्हिडीओ एका यूट्यूब चॅनेलद्वारे बनवण्यात आला आहे. हा चॅनेल अशीच अर्धीनिम्मी व्हिडीओ बनवत असतो. शेहनाज गिल नुकताच 'होंसला रख'च्या प्रोमोशनसाठी सेटवर आली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार च्यारलं झाला होता. यावेळी चाहत्यांना तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि दुःख स्पष्टपणे दिसत होतं. अभिनेत्री हसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यामध्ये ती आधीसारखी गोष्ट नव्हती. तिचं दुःख सर्वांनाच जाणवत होतं. त्यामुळे चाहते तिला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कमेंट्स करत होते.

(हे वाचा:नुसरत जहाँ यांनी गुपचूप उरकलं लग्न? बाळाच्या जन्माबाबतही केला मोठा खुलासा)

एका युजरने कमेंट करत म्हटलं होतं, 'या मुलींमध्ये आमचा जीव आहे'. तर दुसऱ्या युजरने म्हटलं होतं 'देव तुला ताकत देवो' तर आणखी रेखाने म्हटलं होतं, 'स्ट्रॉंग गर्ल' तर आणखी एकाने 'शेहनाज होंसला रख' असं म्हटलं होतं. शेहनाजच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत होते. तिला पुन्हा परत आल्याचं पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. नुकताच शेहनाजचा अभिनेता आणि गायक दलजित दोसांजीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये अभिनेत्री सोनम बाजवादेखील होती. हा व्हिडीओ त्यांच्या 'होंसला रख' या चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यानचा आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजला स्वतःला सावरताना पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

(हे वाचा:अबराम आर्यनचा मुलगा असल्याच्या अफवेने हादरलेलं कुटुंब; शाहरुखचा तो खुलासा चर्चेत)

शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला ही जोडी चाहत्यांना फार पसंत होती. या दोघांना सीडनाज म्हणून ओळखलं जात होतं. सिद्धार्थच्या अशा जाण्याने चाहत्यांना शेहनाजची चिंता लागून आहे. हे दोघेही बिग बॉसच्या घरात भेटले होते. या शोमध्येच त्यांच्यात जवळीकता वाढली होती. शोमध्ये हे दोघेही नेहमी एकमेकांची बाजू घेताना दिसत असत. स्टिच अनेकवेळा शोमध्ये या दोघांनी एकमेकाबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे बिग बॉसपासूनच ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शोनंतरही हे दोघे एकत्र होते. असंही म्हटलं जात हे दोघे लवकरच लग्न करणार होते. लग्नासाठी या दोघांनी प्लॅनिंगही सुरु केलं होतं असं म्हटलं जात. मात्र नियतीला काही वेगळंचं लिहून ठेवलं होतं

First published:

Tags: Entertainment, Sidharth shukla