जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shehnaaz Gill : लालबागच्या दरबारात शहनाज गिल सोबत अनोख्या रुपात दिसला सिद्धार्थ शुक्ला; पाहून तुम्हीही व्हाल EMOTIONAL

Shehnaaz Gill : लालबागच्या दरबारात शहनाज गिल सोबत अनोख्या रुपात दिसला सिद्धार्थ शुक्ला; पाहून तुम्हीही व्हाल EMOTIONAL

Shehnaaz Gill and Siddharth shukla

Shehnaaz Gill and Siddharth shukla

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीला चाहते खूप मिस करतात. पण नुकतंच चाहत्यांना शेह्नाझ सोबत सिद्धार्थची झलक पाहायला मिळाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर:  पंबाजची कतरिना म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शहनाज. बिग बॉसनंतर शहनाजच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात शहनाजला खरं प्रेम तर मिळालं, पण त्या प्रेमाने शहनाजची अर्ध्यावर साथ सोडली. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं आणि साध्या, खोडकळ स्वभावामुळे शहनाज कायम चाहत्यांच्या मनात राहिली. शहनाझ आता सिद्धार्थ शुक्लच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेली आहे. पण आजही ती सिद्धार्थला तेवढं मिस करताना दिसते. नुकतंच अभिनेत्रीने  ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले. तेव्हा सिद्धार्थची झलक पाहायला मिळाली.  चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गणेशोत्सवाचा निमित्ताने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये हजेरी लावताना दिसतात. अभिनेत्री  शहनाज गिल ही तिचा  भाऊ शाहबाज याच्यासोबत लालबागच्या चरणी नतमस्तक झाली. यावेळी शहनाजने पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. दरम्यान, सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे शाहबाजच्या हातावर बनवलेला सिद्धार्थ शुक्लाचा टॅटू. सिद्धार्थ शहनाज आणि त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ होता. डिसेंबर 2021 मध्ये दोघेही लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.पण, गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

जाहिरात

सिद्धार्थ शुक्ला भलेही या जगात नसेल, पण शहनाजच्या भावाने त्याच्या हातावर गोंदवलेल्या सिद्धार्थच्या चेहऱ्याच्या टॅटूच्या माध्यमातून तो  कायम तिच्यासोबत असेल. शहनाज आणि शाहबाज लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. मात्र, सर्वांची नजर सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूवर होती. हेही वाचा - ‘दोन वर्ष त्याने सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं त्यामुळे…’; विकास पाटीलने शेअर केला बाप्पाचा Video अभिनेत्री शहनाज गिल रात्री उशीरा बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागला पोहोचली होती. रात्रीच्या वेळी दर्शनासाठी रांगेत कमी गर्दी असते. अशावेळी शहनाजदेखील भक्तांच्या रांगेत उभी असलेली दिसली. गणपती बाप्पाच्या भक्तांच्या रांगेत उभी असलेल्या शहनाजला पाहून पापराझींचे कॅमेरे देखील तिथे पोहोचले. अनवाणी पायाने बाप्पाच्या दर्शनासाठी शहनाज भक्तांच्या रांगेत तिच्या नंबरची वाट पाहत उभी होती. यावेळी शहनाज गिल एकटी नव्हती तर, तिचा भाऊ शाहबाजही तिच्यासोबत होता. शहनाज आपल्या भावाचा हात पकडून रांगेत उभी होती. तिच्या भावाच्या त्याच हातावर सिद्धार्थचा टॅटू होता. त्यामुळे सिद्धार्थ आज या जगात नसला तरी, शहनाज आजही त्याच्या आठवणींसोबत आयुष्य जगत आहे. तिने ज्या प्रकारे भावाचा हात धरला होता, त्यावरून ती सिद्धार्थ नेहमी आपल्यासोबतच असल्याचे सांगत होती. ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये झळकणार अभिनेत्री! अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. शहनाज सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच शहनाज संजय दत्तसोबत अमेरिका दौऱ्यावर गेली होती. शहनाज गिलने ‘बिग बॉस 13’ मधून चाहत्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले आहे. या शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत मैत्री झाल्यानंतर, ती त्याच्या खूप जवळ आली. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या वेळीही शहनाज गिल त्याच्यासोबत होती. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने ती पार कोलमडून गेली होती. मात्र, आता स्वतःला सावरत ती पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात