मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'दोन वर्ष त्याने सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं त्यामुळे...'; विकास पाटीलने शेअर केला बाप्पाचा Video

'दोन वर्ष त्याने सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं त्यामुळे...'; विकास पाटीलने शेअर केला बाप्पाचा Video

यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.

यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.

यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्टपासून गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 6 सप्टेंबर: यंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून सुरू झाला आहे. तेव्हापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. सगळेजण या उत्साहात सहभागी होऊन जल्लोष साजरा करताना दिसत आहे. अनेक कलाकार गणेशाच्या दर्शनासाठी विविध ठिकाणी हजेरी लावत आहेत. फोटो शेअर करत गणेशोत्सवाचे अनुभव, जुन्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत. अशातच अभिनेता विकास पाटील यानीही गणेशोत्सवाचा खास व्हिडीओ शेअर केलेला पहायला मिळाला.

विकास पाटील यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचा आहे. त्यानं या व्हिडीओसोबत भावनिक कॅप्शनही दिल्याचं पहायला मिळालं. विकास म्हणाला, 'मुंबईत आल्यापासून राजाचं दर्शन कधी चुकलं नाही, त्याने चुकवू दिलं नाही. गेली दोन वर्ष त्याने सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं त्यामुळे या वर्षी भेटीची ओढ तिप्पट वाढली होती .. ती सगळी कसर या भेटीत भरून निघाली. यथेच्छ दर्शन झालं. त्या साठी लालबागच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार'.

View this post on Instagram

A post shared by Vikas B Patil (@_vikas24_)

विकासनं पोस्टच्या शेवटी म्हटलं की, 'बाप्पा अशीच कृपा माझ्या कुटुंबावर आणि मित्रमंडाळीवर राहूदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना'. त्याच्या या पोस्टनं चाहत्यांचं लक्ष वेधलं असून विशेषतः त्याच्या कॅप्शननं अनेकांचं मन जिंकलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरुन कमेटं येत आहेत. लाईक्स आणि कमेंटचाही भरभरुन वर्षाव होत आहे.

हेही वाचा -  Raju Srivastav यांच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर, शरीरात जाणवली हालचाल

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला विकास पाटील आता 'सुख म्हणजे काय असतं' या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

First published:

Tags: Instagram post, Marathi entertainment, Tv actor, TV serials