मुंबई, 28 डिसेंबर - सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनानंतर शहनाज गिल (Shenaaz Gill) सोशल मीडियावर खूप कमी दिसते. सिद्धार्थाच्या अचानक जाण्यामुळे शहनाज पूर्णपणे कोसळी होती. आता मात्र ती यातून बाहेर येत आहे. आपलं दु:ख विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या सोशल मीडियावर ती ज्या ब्रॅंडशीसंबधीत जोडलेली आहे त्याचेच व्हिडिओ पाहायला मिळतात. नुकतेच शहनाज तिचा मॅनेंजर कौशल जोशी(Kaushal Joshi) याच्या इंगेजमेंट सेरेमनीमध्ये डान्स करताना दिसली. तिला परत असं हसाताना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. मात्र तिचं हे हास्य, डान्स ‘बिग बॉस 13′ (Bigg Boss13) चा स्पर्धक आसीम रियाझला (Asim Riyaz) मात्र काहीसे रूचले नाही. तिचा डान्स पाहून आसिमने ट्विट केले आहे.
आसीम रियाझ झाला ट्रोल
शहनाज गिलचा डान्स व्हिडिओ (Shenaaz Gill Dance Video) सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर आसीम रियाझने (Asim Riyaz) ट्वीट करत म्हटले आहे ती, आताच काही डान्स क्लिप पाहिल्या....खरचं..लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्याला किती लवकर विसरतात..क्या बात..क्या बात #NewWorld. आसीमच्या या ट्वीटनंतर मात्र शहनाजचे चाहते त्याच्यावर भडकले आहेत. एकापाठोपाठ एक यूजर्स असीम रियाझला खूप काही सुनावू लागले आहेत.
आसिमच्या चाहत्यांनी देखील सुनावले
आसीमच्या एका चाहत्याने लिहिले आहे, खरे सांगू का.. आसीम तुझ्यापासून तर ही आशा नव्हती. मी मागच्या दोन वर्षापासून तुझी फॅन आहे. ती मागच्या काही दिवसांपासून या सगळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू तिला टोमणा मारत आहे. मला तिला असं पाहून खूप आनंद झाला आहे कारण मला माहिती कुणाला तरी गमवण्याचं दु:ख काय होते. शेम ऑन आसीम रियाझ’. अशी कमेंट करत एका फॅनने त्याला खडेबोल सुनावले आहेत.
शहनाज पार्टीत दिसत होती खूपच सुंदर
शहनाजने त्च्या मॅनेजरच्या साखरपुड्यात काळ्या रंगाचा चमकदार गाऊन घातला होता. यासोबतच एक सैल पोनी बांधली होती. शहनाज या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिला असं पुन्हा आनंदात पाहिल्यानंतर चाहते खूप आनंदी आहेत. कश्मीरा शाह, मोनालिसा, जॉर्जिया एड्रियानी आणि परितोष त्रिपाठी यांच्यासह अनेक लोक या एंगेजमेंटमध्ये पोहोचले होते.
Our strong girl #ShehnaazGill ✨✨💖💖 Aise hi khush raho hamesha pic.twitter.com/eNtK7DCh8n
— ✨✨Lamia✨✨ (@AzraLamia) December 27, 2021
'बिग बॉस 13' मध्ये भेटले
दिवंगत सिद्धार्थ शुक्लाची शहनाज गिल ही जवळची मैत्रीण होती. या वर्षी वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. दोघांची पहिली भेट 'बिग बॉस 13' मध्ये झाली होती. या शोमध्ये दोघे जवळ आले. दोघेही चाहत्यांमध्ये सिदनाज म्हणून प्रसिद्ध होते. या पर्वत असीम रियाझही होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bollywood News, Entertainment, Sidharth shukla