मुंबई, 23 जानेवारी: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. शिझान खान अजूनही तुरुंगात असून त्याला अजून दिलासा मिळालेला नाही. अभिनेत्याचे घरचे सध्या त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. विशेष करून त्याच्या बहिणी त्याच्यासाठी लढत आहेत. अभिनेता शिझान खानची बहीण फलक नाझ हिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शिझान खानच्या आईने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. त्याच्या आईने केलेल्या या पोस्टची सध्या खूपच चर्चा होत आहे.
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खानची बहीण फलक नाझ सध्या रुग्णालयात दाखल असून कुटुंबाची अवस्था बिकट आहे. शिझानची आई कहकशां फैझी यांनी भावुक पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. शिझान खानची आई कहकशां यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांची मुलगी फलक नाज बेडवर झोपल्याचे पाहायला ‘मिळत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘संयम’ असे लिहिले आहे. त्याबरोबर त्यांनी हात जोडल्याचा एक इमोजीही शेअर केला आहे. तसेच मुलगा शिझान गेल्या एक महिन्यापासून तुरुंगात असून मुलगी फलक रुग्णालयात दाखल आहे.
फलकला नेमकं काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र तिची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. शिझान खान आणि फलकच्या आईने लिहिले आहे की, 'मला समजत नाहीये की आमच्या कुटुंबाला कशासाठी आणि का शिक्षा दिली जात आहे? माझा मुलगा शिझान गेल्या एक महिन्यापासून कोणत्याही पुराव्याशिवाय कैद्यांप्रमाणे तुरुंगात शिक्षा भोगत आहे. माझी मुलगी फलक रुग्णालयात दाखल आहे. शिझानचा धाकटा भाऊ ऑटिस्टिक मूल असून तो आजारी आहे. एखाद्या आईने दुसऱ्याच्या मुलावर आई म्हणून प्रेम करणे हा गुन्हा आहे का? हे बेकायदेशीर आहे का?'
तुनिषा शर्माचा संदर्भ देत काहक्शान म्हणजेच शिझानच्या आईने पुढे लिहिले आहे की, 'आम्हाला त्या मुलीवर प्रेम करण्याचा अधिकार नव्हता का? आम्ही मुस्लिम आहोत म्हणून? आमचा गुन्हा काय?'
शिझान खान हा तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती आहे. अभिनेत्रीने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही शोच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तुनिषाने को-स्टार शीजान खानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे संतापलेल्या वनिता शर्मा यांनी शीजनवर गंभीर आरोप केले. तेव्हा पोलिसांनी शीजनला ताब्यात घेतले. तेव्हापासून शीजनला न्यायालयीन कोठडीत कारागृहात ठेवण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी, अभिनेत्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य केले नाही आणि काही व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट केल्याचा युक्तिवाद करून पालघर न्यायालयाने जामीन नाकारला होता. अशा स्थितीत जामिनावर सुटल्यानंतर शिझान खान महत्त्वाच्या साक्षीदारांना धमकावू शकतो म्हणून त्याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actor, Tv actress, Tv celebrities