15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेल्या या शोचा समारोप एका ग्रँड फिनालेसह झाला. सेलिब्रिटी अतिथी विशेषत: बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी या सोहळ्याला उपस्थित होते.
टॉप ६स्पर्धकांमध्ये हर्ष सिकंदर, राफा येस्मिन, अथर्व बक्षी, अतनु मिश्रा, जेतशेन डोहना लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे यांची नावे होती.
मराठमोळ्या ज्ञानेश्वरी घाडगेला मागे टाकत सिक्कीममधील पाकयोंग येथील नऊ वर्षीय जेतशेन डोहना लामा 'सा रे ग मा प लिएल चॅम्प्स' या सिंगिंग रिअॅलिटी शोची विजेती ठरली आहे.
जेतशेनची हेमा मालिनी यांनी प्रशंसा करत तिच्या आवाजाची तुलना दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली होती.
जेतशेनला विजेते म्हणून घोषित करण्यात आले तर मराठमोळी अहमदनगरच्या ज्ञानेश्वरी घाडगेने तिसरा क्रमांक पटकावला.