जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी

शिझान मोहम्मद खान

शिझान मोहम्मद खान

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 डिसेंबर : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी टुनिषाचा सहकलाकार असलेला तिचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानला ताब्यात घेतलं आहे. शिझान मोहम्मद खान आणि टुनिषाचे प्रेमसंबंध होते, पण यातून नैराश्य आल्यामुळे टुनिषाने आत्महत्या केल्याचं तिच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे, तसंच शिझानला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील  मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचं कारण ठरणाऱ्या शिझान मोहम्मद खानला  28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिझानला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सीझानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हेही वाचा - Tunisha Sharma:12 वर्षीच मिळाला पहिला पे-चेक तर टेबलाखाली सापडलं पहिलं प्रेमपत्र; असं होतं तुनिषाचं आयुष्य शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण नुकत्याच तुनिषाच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत. तिची काकू परदेशात राहत असल्याने तिला यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार उद्या किंवा परवा होतील.

जाहिरात

तुनिषाचे मामा पुढे म्हणाले,“तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. तुनिषा आणि शिझान यांच्यात बिनसल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. शिझानने आपली फसवणूक केल्याची माहिती तुनिषाने कुटुंबियांना दिली होती. तुनिषाच्या निधनाने तिच्या आईची प्रकृती आता खालावली आहे. हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसई नजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मानं शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. तुनिशा आणि शिजान हे दोघं सध्या सब टीव्हीच्या अलिबाबा… दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात