मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधात ED कडे तक्रार, काय आहे नेमके प्रकरण?

शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह पत्नी आणि मुलाविरोधात ED कडे तक्रार, काय आहे नेमके प्रकरण?

शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा (Poonam Sinha) आणि त्यांचा मुलगा कुश सिन्हा यांच्या विरोधात संदीप दबाधे नावाच्या व्यक्तीने अंमलबजावणी संचालनालयाकडे (Enforcement Directorate- ED) ) तक्रार केली आहे

मुंबई, 22 डिसेंबर- बॉलीवूड चित्रपट स्टार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा (Poonam Sinha) आणि त्यांचा मुलगा कुश सिन्हा यांच्या विरोधात संदीप दबाधे नावाच्या व्यक्तीने अंमलबजावणी संचालनालयाकडे (Enforcement Directorate- ED) ) तक्रार केली आहे. संदीप दबाधेने चौकशीसाठी अर्ज केला आहे. पुण्यातील वागोली परिसरातील रहिवासी संदीप दबाधे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, हे प्रकरण एक हेक्टर जमिनीशी संबंधित आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

ईडी मुख्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीची चौकशी एजन्सी ईडीच्या तपास पथकाकडून केली जाईल. हे प्रकरण खरोखरच मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत(Money Laundering Act) म्हणजेच पीएमएलए (PMLA) अंतर्गत येते की नाही? त्यानंतर हा खटला त्या कायद्यांतर्गत येत असेल तरच या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. अन्यथा तो गुन्हा ईडीकडून नोंदवला जाणार नाही.

वाचा-'माय पार्टनर..' म्हणत तेजश्री प्रधानने शेअर केला फोटो, पोस्टची रंगलेय चर्चा!

तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सध्या स्थानिक पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. पोलीस आणि ईडीला दिलेल्या तक्रारीत हवेली तालुक्यात राहणारे फिर्यादी संदीप दबाधे यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या मृत वडिलांच्या नावावर शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या जवळच्यांनी कोट्यवधी रुपयांची सुमारे एक हेक्टर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

2007 मध्ये संदीपच्या वडिलांचे निधन झाले

2007 मध्ये संदीपच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे या मालमत्तेवर फक्त संदीपचाच हक्क आहे. त्यामुळे हे प्रकरण स्थानिक न्यायालयातून आता तपास यंत्रणेच्या दारात पोहोचले आहे. परंतु प्राथमिक माहितीच्या आधारे असे दिसून आले आहे की, हे प्रकरण ईडी अंतर्गत येत नाही. आता यावर ईडी काय उत्तर देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा-राखीसोबत तेव्हाच लग्न करणार जेव्हा..,रितेशचा लग्नावर धक्कादायक खुलासा

शत्रुघ्न सिन्हा यांची काय असणार यावर प्रतिक्रिया

या प्रकरणात ज्याप्रकारे फिल्मस्टार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्या बाजूने अद्याप कोणतेही औपचारिक वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर ते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Shatrughan sinha