मुंबई, 11 ऑगस्ट: प्रत्येकाच्या आयुष्यात भाऊ बहिणीचं नात खास आहे. बहिण भावाच्या भांडणांशिवाय त्या नात्यालाही मज्जा नाही. अशा अनेक जोड्या आपण टेलिव्हिजनवर दररोज पाहतोय. त्यातील काही भावंड तर कधीकधी आपल्याला आपल्यासारखीचं वाटू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का टेलिव्हिजनवर ऑनस्क्रिन भाऊ बहिण असलेले अनेक कलाकार आजही एकमेकांचे बहिण भाऊ म्हणून नातं निभावत आहेत. कलाकार आजही एकत्र येऊन राखीपौर्णिमा असेल किंवा आयुष्यातील इतर सुख दुख: शेअर करत असतात. अशीच एक ऑनस्क्रिन भाऊ बहिणींची जोडी आहे ती म्हणजे शर्मिष्ठा राऊत आणि ललित प्रभाकर यांची. जुळून येती रेशीमगाठी या झी मराठीवरील सर्वाधिक गाजलेल्या मालिकेत ललित आणि शर्मिष्ठा एकमेकांचे भाऊ बहिण दाखवले होते. मात्र कलाकारांचं हे ऑनस्क्रिन नात ऑफस्क्रिन देखील आजही तसंच आहे. आज राखीपौर्णिमेच्या निमित्तानं अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं मालिकेतील जुना रक्षाबंधनाचा एपिसोड शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. ‘माझा सगळ्यात लाडका भाऊ. डिअर भाऊराया लव्ह यू ललित’, असं म्हणत शर्मिष्ठानं व्हिडीओ शेअर केला आहे. शर्मिष्ठा आणि ललित यांची मालिकेपासूनच चांगली गट्टी जमली होती. दोघांची ऑनस्क्रिन भावा बहिणींची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्या भूमिकेबरोबरच दोघांच्या ऑफस्क्रिन नात्याची गाठ ही तिथेच बांधली गेली. हेही वाचा - Rakshabandhan 2022 : स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये असे साजरे झाले रक्षाबंधन; पाहा फोटो
मालिकेत तर शर्मिष्ठानं ललितला राखी बांधलीच मात्र त्यानंतर आलेल्या प्रत्येक राखीपौर्णिमेला शर्मिष्ठानं भेटून ललितला राखी बांधली आहे. दोघांचं प्रेम मराठी टेलिव्हिजन सृष्टीमध्ये चांगलंच चर्चेत आहे. ललितनं शर्मिष्ठाला तिच्या वाईट वेळेत फार मोलाची साथ दिली आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर शर्मिष्ठानं अनेक वेळा तिच्या भावाची म्हणजेच ललितची आठवण काढली होती. शर्मिष्ठा नेहमीच कोणताही निर्णय घेण्याआधी तिच्या जवळच्या माणसांचा सल्ला घेते तिच्या जवळच्या माणसांमध्ये ललितचाही समावेश आहे. मालिकेविषयी सांगायचं झालं तर जुळून येती रेशीमगाठी ही मालिका 2015मध्ये झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेची कथा ते मालिकेचं शिर्षक गीत सर्वांना आवडलं. इतकच नाही मालिकेतील आदित्य मेघनाची जोडी तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मालिकेत शर्मिष्ठा राऊत सुकन्या कुलकर्णी, गिरीश ओक, मधुगंधा कुलकर्णी, उदय टिकेकर सारखी तगडी स्टारकास्ट होती. आजही प्रेक्षक मालिकेचे भाग झी5 वर पाहतात. मालिकेची लोकप्रियता इतक्या वर्षांनीही कमी झालेली नाही.