वासुदेव आला हो...! शंकर महादेवन यांनाही आवरला नाही Video शेअर करण्याचा मोह

वासुदेव आला हो...! शंकर महादेवन यांनाही आवरला नाही Video शेअर करण्याचा मोह

शंकर महादेवन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : आज महाराष्ट्रात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. या मराठी संस्कृतीत वासुदेवाला खूप महत्त्व आहे. गावाकडे भल्या पहाटे येणारा वासूदेव लहान-थोरांच्या आकर्षणाचा विषय असतोच पण हाच वासुदेव शहरात मात्र फार क्वचित पाहायला मिळतो. मुंबईत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांची अशाच एका वासुदेवाशी नुकतीच भेट झाली आणि त्याचा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही.

शहरांमध्ये इमारतीखाली वासुदेव आल्यावर लहान मुले अनेकदा पळत त्याला पहायला खाली जातात. शंकर महादेवन यांच्याबरोबरही काहीसं असच घडलं. महादेवन यांच्या इमारतीखालून रस्त्यावरुन जाणाऱ्या वासूदेवाचा आवाज ऐकून खाली उतरले आणि त्यांनी या वासुदेवाशी गप्पा मारल्या. त्यांनी वासुदेवाला गाणं गाण्यास सांगितलं आणि त्याचा हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

बॉलिवूडमधील आणखी एका कपलचा काडीमोड, 10 वर्षांचा संसार मोडला

या व्हिडिओमध्ये सुरुवातील महादेवन वासुदेवाशी गप्पा मारताना दिसत आहेत. ते वासुदेवाला त्याचं नाव विचारतात ‘माझं नाव पोपट विधाते असं आहे. मी वयाच्या ११ व्या वर्षापासून असा वासुदेव म्हणून फिरतोय’ असं ही व्यक्ती व्हिडिओमध्ये महादेवन यांना सांगाता दिसते. त्यानंतर महादेवन त्यांच्या डोक्यावरील विठ्ठल रखुमाईची मुर्ती पाहून पोपट विधातेंचं कौतुक करतात.

अभिनेत्रीच्या सौंदर्याची तुलना होतेय तिच्याच लेकीशी, भावाच्या लग्नात केली धम्माल

‘हे पोपट विधाते साहेब रस्त्यावर गाणं गात होते. ते इतकं छान गातं होते मी विचार केला व्हिडिओ शूट करुन तुमच्यापर्यंत पोहचवावा असा विचार केला. आपल्या देशात किती कला आहे पाहा,” असं म्हणत महादेवन या वासुदेवाला गाणं ऐकवण्यास सांगतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

‘तुझी बायको तुझ्याहून10 वर्षांनी मोठी आहे’ निकनं ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

First published: February 27, 2020, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading