

टीव्ही मालिका मेरे डॅड की दुल्हन मधील हटके भूमिका आणि हम तुम और देम या वेब सीरिज मधील बोल्ड अवतार यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा भावाच्या लग्नातील तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.


श्वेता तिवारी नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहीली आहे. नुकतंच तिच्या भावाचं लग्न गोव्यात पार पडलं. यावेळी श्वेता धम्माल करताना दिसली.


भावाच्या लग्नाचे काही फोटो श्वेतानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तिची मुलगी सुद्धा तिच्यासोबत होती. मात्र लुकच्या बाबतीत श्वेता तिच्या मुलीवरच भारी पडताना दिसली.


पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. पलक ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र तिच्या फोटोंची चर्चा नेहमीच असते.


लग्नातील सर्वाच फोटोंमध्ये खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. याआधी तिनं भावाच्या हळदीचे काही फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.


भावाच्या लग्नात श्वेतानं पिंक कलरचा गाऊन घातला होता. ज्यावर तिनं डायमंड इअरिंग्स आणि ब्रेसलेट कॅरी केलं होतं.