'शक्तिमान' अगदी ठणठणीत! असल्या अफवा उठवू नका; स्वतः मुकेश खन्नांनीच केलं निधनाच्या बातमीचं खंडन!

'शक्तिमान' अगदी ठणठणीत! असल्या अफवा उठवू नका; स्वतः मुकेश खन्नांनीच केलं निधनाच्या बातमीचं खंडन!

एखाद्या अभिनेत्याच्या निधनाची अफवा उठण्याची ही पहिली वेळ नाही. सोशल मीडियातून अशा बातम्या सैरभैर होतात. आता मुकेश खन्ना यांनीच स्वतः 'शक्तिमानविषयीच्या अफवांकडे लक्ष देऊ नका', असं सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे-  देशात कोरोनाने (Coronavirus)  थैमान घातलं आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाचं कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा मनोरंजनसृष्टीने अनेक चांगल्या कलाकारांना गमावलं आहे. तसेच या काळात अनेक कलाकारांच्या निधनाच्या अफवा(Death Rumor) सुद्धा पसरत आहेत. नुकताच ‘शक्तिमान’ (Shaktiman) फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या निधनाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. मात्र या अफवांचं स्वतः मुकेश खन्ना यांनी खंडन केलं आहे.

tv9 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे, की त्यांची तब्ब्येत पूर्णपणे बरी आहे. ते अगदी उत्तम आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या ज्या चर्चा होत आहेत, त्यात काहीही सत्य नाहीय. मी पूर्णपणे बरा आहे त्यामुळे अशा उठणाऱ्या अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका’. मुकेश खन्ना यांच्याशी झालेल्या संवादा नंतर tv9 ने ट्वीट करत या गोष्टीचा खुलासा केला आहे.

ही पहिली वेळ नाहीय की एखाद्या अभिनेत्याच्या निधनाची अफवा उठलेली आहे. काही दिवसांपूर्वीचं गायक आमिर अली, अभिनेत्री मीनाक्षी क्षेशाद्री आणि आणखी काही ज्येष्ठ अभिनेत्यांच्या निधनांच्या अफवा उठल्या होत्या. मात्र यावेळी कलाकारांनी सोशल मीडियावर येत आपल्या निधनाच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगत अफवांचं खंडन केल आहे.

(हे वाचा:तिथे लस कशी मिळाली? ओळखीचा फायदा घेतल्याचं म्हणणाऱ्या ट्रोलर्सला फरहानचं उत्तर  )

मुकेश खन्ना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी विविध भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध पौराणिक मालिका ‘महाभारत’ मध्ये त्यांनी पितामह ‘भीष्म’ ही भूमिका साकारली होती. यामुळे ते प्रचंड प्रसिद्ध झाले होते.

(हे वाचा: अभिनेत्री वैशाली टक्करने थांबवल लग्न, करतेय गरजूंना मदत )

त्यांनतर त्यांनी ‘शक्तिमान’ या मालिकेतून आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व दाखवलं होतं. यामध्ये त्य्यांनी शक्तिमान आणि गंगाधर अशी दोन पात्रे साकारली होती. लहान मुलांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. सुपरमॅन वगैरेच्या परदेशी सुपरहीरोंच्या गर्दीत देशी मुलांना फक्त आणि फक्त शक्तिमानच माहीत होता. देशातील कित्येक मुलांचा बालपण ही मालिका पाहातच गेलं आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 11, 2021, 9:10 PM IST
Tags: tv actor

ताज्या बातम्या