मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'माझ्या देशातील लोक मरत असताना मी कसा आनंद साजरा करू', म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीनं थांबवलं लग्न

'माझ्या देशातील लोक मरत असताना मी कसा आनंद साजरा करू', म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीनं थांबवलं लग्न

छोट्या पडद्यावरील (TV Actress) प्रसिद्ध मालिका ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) फेम अभिनेत्री वैशाली टक्करचा (Vaishali Takkar) महिन्यापूर्वीच साखरपुडा पार पडला होता.

छोट्या पडद्यावरील (TV Actress) प्रसिद्ध मालिका ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) फेम अभिनेत्री वैशाली टक्करचा (Vaishali Takkar) महिन्यापूर्वीच साखरपुडा पार पडला होता.

छोट्या पडद्यावरील (TV Actress) प्रसिद्ध मालिका ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) फेम अभिनेत्री वैशाली टक्करचा (Vaishali Takkar) महिन्यापूर्वीच साखरपुडा पार पडला होता.

मुंबई, 11 मे:  छोट्या पडद्यावरील (TV Actress) प्रसिद्ध मालिका ‘ससुराल सिमर का’ (Sasural Simar Ka) फेम अभिनेत्री वैशाली टक्करचा (Vaishali Takkar) महिन्यापूर्वीच साखरपुडा पार पडला होता. आणि सर्वांनाच अपेक्षा होती की लवकरच ती लग्न देखील करेल. मात्र वैशालीने पुढच्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.  देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना हाहाकाराने वैशालीने हा निर्णय घेतला आहे. वैशाली सध्या गरजूंना मदत करताना दिसून येत आहे. वैशाली गरजूंना अन्नदान आणि औषधांचं वाटप करताना दिसून येत आहे.

सध्या वैशाली एका संघटनेसोबत मिळून हे काम करत आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत वैशालीनं म्हटलं आहे, ‘मी सध्या एका विद्यार्थी संघटनेसोबत मिळून हे काम करत आहे. ही युवा संघटना कोरोना काळात गरजूंना आवश्यक गोष्टींचा पुरवठा करत आहे.

वैशाली पुढं म्हणते, माझ्या देशात लोक कोरोनाशी लढा देत आहेत. ही वेळ लग्नाची, उत्सवाची किंवा देशाबाहेर जाऊन कोणताही आनंद साजरा करण्याची नाहीय. ही वेळ फक्त आणि फक्त एकजूटीने लढा देण्याची आहे. त्यामुळे मी माझा विवाह पुढे ढकलला आहे’.

तसेच ती म्हणते, देशात दररोज असंख्य लोकांचा मृत्यू होत आहे. अशात मी आनंद कसा साजरा करू शकते. माझ्या देशाची अशी परिस्थिती असताना मला लग्न करणं योग्य नाही वाटत. जर पुढच्या वर्षी सुदैवाने सर्वकाही ठीक असेल, तरच मी लग्न करेन’. वैशालीने एका महिन्यापूर्वी डॉ. अभिनंदन हुंद्लसोबत साखरपुडा केला होता. आणि जून मध्ये लग्न करून ती युगांडाला स्थायिक होणार होती. मात्र कोरोनामुळे तिने आपला निर्णय बदलला आहे.

(हे वाचा:तिथे लस कशी मिळाली? ओळखीचा फायदा घेतल्याचं म्हणणाऱ्या ट्रोलर्सला फरहानचं उत्तर)

वैशाली सध्या रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत आहे. त्याबद्दल बोलताना वैशाली म्हणते, ‘कोरोना काळामध्ये अनेक नकारात्मक आणि दुखद गोष्टी ऐकायला मिळत आहेत. दररोज देशात असंख्य लोक याला बळी पडत आहेत. कित्येक लोक भुकेने मरत आहेत. तर कित्येक लोक ऑक्सिजन, बेड, पाल्झ्मा आणि औषधांच्या तुटवड्याने मरत आहेत. त्यामुळे मी नुकताच इंदौरमधील ‘स्टुडंट हेल्पिंग हँड्स’ या संघटनेमध्ये सहभागी झाली.

(हे वाचा:  साडीत खुललं श्रेया बुगडेचं सौंदर्य, चाहत्यांनी केली ब्रिटीश मॉडेलशी तुलना PHOTO )

या संघटनेमार्फत आम्ही त्या लोकांना मदत करत आहोत. ज्यांना अन्नाची गरज आहे, ज्यांना ऑक्सिजन, बेड किंवा प्लाझ्माची गरज आहे, किंवा जे विद्यार्थी आपली शैक्षिणिक फी देऊ शकत नाहीत, ज्यांना कपड्यांची आवश्यकता आहे. अशा सर्व गरजूंना यामार्फत मदत दिली जात आहे.

First published:

Tags: Coronavirus, Marathi entertainment, Tv actress