जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी आयुष्यात पहिल्यांदा हादरलो आहे', ICU बेड न मिळाल्याने अभिनेते मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन

'मी आयुष्यात पहिल्यांदा हादरलो आहे', ICU बेड न मिळाल्याने अभिनेते मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन

'मी आयुष्यात पहिल्यांदा हादरलो आहे', ICU बेड न मिळाल्याने अभिनेते मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं निधन

दोन दिवसांपासून अभिनेते (Actor) मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या निधनाच्या अफवा उठल्या होत्या. त्यामुळे मुकेश खन्ना यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत आपण ठीक असल्याची माहिती दिली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मे: दोन दिवसांपासून अभिनेते (Actor) मुकेश खन्ना (Mukesh Khanna)  यांच्या निधनाच्या अफवा उठल्या होत्या. त्यामुळे मुकेश खन्ना यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत आपण ठीक असल्याची माहिती दिली होती. हे सर्व सुरु असतानाचं मुकेश खन्ना यांना आणखी एक धक्का बसला आहे. नुकतंच मुकेश खन्ना यांच्या एकुलत्या एका बहिणीचं निधन (Mukesh Khanna Sister’s Death) झालं आहे. मुकेश खन्नानी स्वतः आपल्या सोशल मीडियावरून याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

जाहिरात

मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बहिणीसोबत फोटो पोस्ट करत त्यांच्या निधनाची दुखद माहिती दिली आहे. फोटो शेयर करत त्यांनी अत्यंत भावुक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. फोटो पोस्ट करत मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे, ‘काल मी कित्येक तास माझ्या मृत्यूचं सत्य सांगण्यासाठी धडपड करत होतो. मात्र मला अजिबात अंदाजा नव्हता की एक भयंकर सत्य माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक मोठ्या बहिणीचं दिल्लीमध्ये निधन झालं आहे. तिच्या निधनामुळे मी हादरून गेलोय. माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 12 दिवस तिने कोरोनाशी लढा दिला होता. मात्र लन्ग्स कन्जेक्शनमुळे आम्ही तिला गमावलं. समजत नाही देव कोणता हिशोब चुकता करत आहे. आज मी पहिल्यांदा आयुष्यात हादरून गेलोय.’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे. (हे वाचा: हुमा कुरेशी उभारतेय रुग्णालय, हॉलिवूड दिग्दर्शकाचीही मदतीला धाव ) एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे, त्यांच्या बहिणीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र तरीसुद्धा त्यांना श्वास घ्याला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ICU बेडच्या शोधात होतो. मात्र शेवटपर्यंत त्यांना बेड नाही मिळाला, आणि त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. (हे वाचा: तू देशाचा पंतप्रधान हो’; चाहत्यांच्या इच्छेवर सोनू सूद म्हणाला   ) आजचं त्यांच्या बहिणीवर अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले. मात्र सध्याच्या वातावरणामुळे त्यांना आपल्या बहिणीला शेवटचं पाहतासुद्धा नाही आलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात