मुंबई, 12 मे- कोरोना संकटातून(Corona Pandemic) देशाला बाहेर काढण्यासाठी अनेक लोक मदतीचा हात देत आहेत. यामध्ये कलाकार सर्वात पुढे आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार मदतीसाठी धाव घेत आहेत. आत्ता अभिनेत्री हुमा कुरेशी(Huma Kureshi) सुद्धा यामध्ये सहभागी झाली आहे. हुमा कुरेशी दिल्ली मध्ये 100 बेडचं टेम्पररी रुग्णालय उभारत आहे. याचं कामसुद्धा सुरू झालं आहे. हुमाने यासाठी ‘सेव द चिल्ड्रेन’ (Save The Children) या संस्थेची मदत घेतली आहे. तसेच तिने यासाठी एक फंड रायजिंग कॅम्पेनसुद्धा सुरु केलं आहे. आत्ता यामध्ये हुमाला हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक (Hollywood Director) जॅक स्नायडर(Zack Snyder) यांचीसुद्धा साथ मिळाली आहे.
View this post on Instagram
हुमा कुरेशीने सोशल मीडियावर रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. आणि त्याचबरोबर या उपक्रमात सहकार्य करण्याचं आवाहन देखील केल आहे. हुमाने आपल्या या उपक्रमाला ‘ब्रीद ऑफ लाईफ’ असं नाव दिल आहे. त्याचबरोबर हुमाने म्हटलं आहे, ‘या रुग्नालायात एक ऑक्सिजन प्लान्ट देखील उभारला जात आहे. दिल्लीमध्ये प्रत्येक श्वासासाठी लढा देणाऱ्या माझ्या लोकांसाठी ‘सेव द चिल्ड्रेन’ सोबत हा माझा एक प्रयत्न आहे. या कठीण काळात आपली जबाबदारी आहे, की आपण शक्य त्या पद्धतीने आपण मदतीसाठी हातभार लावला पाहिजे’.
I’ve joined hands with Save The Children to help Delhi fight the pandemic. They are working to build a temporary hospital facility in Delhi with 100 beds along with an oxygen plant. Please support❤️🙏🏻 #BreathofLife @humasqureshi International donors: https://t.co/9ZbOQuzwQ0
— Zack Snyder (@ZackSnyder) May 10, 2021
हुमा कुरेशीची ही पोस्ट हॉलिवूडचे दिग्दर्शक जॅक स्नायडर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केली आहे. याबरोबर त्यांनी या मोहिमेत आपण सोबत असल्याचं आश्वासनही दिल आहे. आणि इतर लोकांनाही मदत करण्यासाठी आवाहन केलं आहे.
(हे वाचा:'शक्तिमान' अगदी ठणठणीत! असल्या अफवा उठवू नका; स्वतः मुकेश खन्नांनीच दिलं उत्तर )
जॅक यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, ‘कोरोना काळासाठी दिल्ली मध्ये 100 बेडचं रुगणालय उभारण्यात येत आहे, यामध्ये हीसुद्धा ‘सेव द चिल्ड्रेन’ या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. सोबतचं इतर हॉलिवूड कलाकारांकडूनही सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करेन’.
(हे वाचा: अभिनेत्री वैशाली टक्करने थांबवल लग्न, करतेय गरजूंना मदत )
जॅक स्नायडर यांचा आगामी चित्रपट ‘आर्मी ऑफ द डेड’ लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटातून हुमा आपला हॉलिवूड डेब्यू करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Coronavirus, Delhi