• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘आम्ही पाठीशी आहोत तू देशाचा पंतप्रधान हो’; चाहत्यांच्या इच्छेवर सोनू सूद म्हणाला

‘आम्ही पाठीशी आहोत तू देशाचा पंतप्रधान हो’; चाहत्यांच्या इच्छेवर सोनू सूद म्हणाला

सोनूला जेव्हा लोकांकडून व्यक्त होणाऱ्या या इच्छेबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा त्याने आपल्या स्वतःच्या शैलीत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

 • Share this:
  मुंबई 12 मे: कोरोना काळात अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) अनेकांना मदत केली. बॉलिवूडमधले आणि टीव्ही उद्योगातले अनेक सेलेब्रिटीज यांनीही सोनूकडून प्रेरणा घेऊन लोकांसाठी मदतकार्य (Social Work) सुरू केलं. दरम्यानच्या काळात सोनू सूदला स्वतःलाही कोरोनाची लागण झालीमात्र त्याने आपलं मदतकार्य नेटाने सुरूच ठेवलं. तो निःस्वार्थभावनेने करत असलेली सेवा पाहून अनेक नागरिकतसंच सेलेब्रिटीजनीही सोनू सूद पंतप्रधान व्हायला हवाअशी अपेक्षा व्यक्त केली. सोनूला जेव्हा लोकांकडून व्यक्त होणाऱ्या या इच्छेबद्दल सांगण्यात आलंतेव्हा त्याने आपल्या स्वतःच्या शैलीत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. अलीकडेच सोनूसूदला त्याच्या राहत्या बिल्डिंगच्या बाहेर लोकांचा जमाव दिसला. त्यांनापाहून सोनू सूद घराबाहेर आला. त्यांना त्याने थंड ज्यूसही दिला. लोकांना त्याचं हे आदरातिथ्य खूप भावलं. याच गर्दीतल्या कोणी तरी एका व्यक्तीने सोनू पुढचा पंतप्रधान व्हायला हवा,अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर सोनू म्हणाला, 'जो जिथे आहेतो तिथेच योग्य आहे. मी सामान्य माणूस आहे तेच बरं आहे. तुमच्यासोबतच तर मी उभा आहे.' तारक मेहता फेम टप्पूवर कोसळला दु:खाचा डोंगर; कोरोनामुळं वडिलांचं निधन केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हेतर अनेक सेलेब्रिटीजनहीसोनू पंतप्रधान (Prime Minister) व्हायला हवाअशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. राखी सावंतवीर दास आदींचा त्यात समावेश आहे.
  सोनू सूदने सिनेमामध्ये साकारलेल्या अनेक भूमिका नकारात्मक छटा असलेल्या आहेतप्रत्यक्ष जीवनात मात्र त्याने एखाद्या हिरोला (Hero) शोभेलसं कार्य केलं आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनपासून तो लोकांना मदत करतो आहे. न थांबतान दमता तो लोकांना मदत करतोय. दररोज शेकडो कॉल्स तो अटेंड करतो आणि त्यांना शक्य असेल ती मदत पोहोचवतो. कोणाला उपचारांसाठी आवश्यक साहित्यतर कोणाला जीवनावश्यक वस्तू आदींचा पुरवठा तो करतो आहे. त्यामुळेच सोनू सूदने लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. 'आज तक'शी संवाद साधताना सोनू म्हणाला होता, 'सध्याचा काळ असाआहे,की प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. मी हे कसं करू शकतोय,हे मलाचमाहिती नाही. जवळपास22तास मी फोनवरच असतो. मदतीसाठी जवळपास 40ते 50 हजारजणांकडून मेसेजेस/ कॉल्स येतात.' वैयक्तिक मदतीखेरीज सोनू परदेशीकंपन्यांच्या साह्याने भारतात ऑक्सिजन प्लांट्स (Oxygen Plants)उभारण्याच्या कामीही मदत करत आहे. चीन,फ्रान्स आणि तैवान या देशांतल्याकंपन्यांच्या मदतीने देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स तयारकरण्याचं काम सुरू असल्याचं सोनू सूदने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतसांगितलं होतं. कोरोनाची तिसरी लाट आली,तर त्याआधी पुरेशी तयारीकरण्यासाठी यामुळे मदत होऊ शकणार आहे.
  First published: