मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

..अन् सेटच गेला उडून; चक्रीवादळामुळं सलमान खानचं कोट्यवधींचं नुकसान

..अन् सेटच गेला उडून; चक्रीवादळामुळं सलमान खानचं कोट्यवधींचं नुकसान

चक्रीवादळाचा बॉलिवूड भाईजानलाही मोठा फटका, सेटच उडून गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान

चक्रीवादळाचा बॉलिवूड भाईजानलाही मोठा फटका, सेटच उडून गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान

चक्रीवादळाचा बॉलिवूड भाईजानलाही मोठा फटका, सेटच उडून गेल्यानं कोट्यवधींचं नुकसान

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 20 मे: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळानं (Cyclone) केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये थैमान घातलं. या वादळामुळं संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अगदी लोकांची घरं देखील उद्धस्त केली. अगदी काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. या चक्रीवादळाचा मोठा फटका सलमान खानला (Salman Khan) देखील बसला आहे. त्याचा टायगर 3 (Tiger 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. परंतु आलेल्या वादळामुळं त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला. परिणामी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच सलमानला कोट्यवधींचा फटका बसला आहे.

टायगर 3 हा सलमानच्या टायगर अभी जिंदा है या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटात सलमानसोबत त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ देखील झळकणार आहे. गेली दोन वर्ष हा चित्रपट कोरोनामुळं वारंवार पुढे जात होता. अखेर महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी मिळवत सलमाननं मुंबईत सेट तयार करुन घेतला. मात्र नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळं हा संपूर्ण सेट उडून गेला आहे. परिणामी बॉलिवूडच्या भाईजानला कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. शिवाय सलमानच्या चाहत्यांना आता आणखी काही काळ या चित्रपटासाठी वाट पाहावी लागणार आहे.

अंथरूणाला खिळली लेक, लॉकडाऊनमुळे हाती पैसाही नाही; 2 वेळेच्या जेवणासाठी अभिनेत्रीवर ओढावली पुरस्कार विकण्याची वेळ

गेल्या वर्षी देखील अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘अम्फान’ या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला जोरदार तडाखा बसला होता. यामध्ये महाराष्ट्रासह कोलकाता देखील होरपळून निघाला होता. त्यावेळी देखील अनेक नामांकित बॉलिवूड चित्रपटांचे सेट वादळामुळं उडून गेले होते. त्यापैकी काही चित्रपटांचं चित्रीकरण अद्याप सुरु झालेलं नाही.

First published:

Tags: Entertainment, Salman khan, Tiger