जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘ती चांगली आई आहे, मात्र...’; श्वेता- अभिनवच्या वादात राजा चौधरीची उडी, घटस्फोटित पत्नीवर ओढले ताशेरे

‘ती चांगली आई आहे, मात्र...’; श्वेता- अभिनवच्या वादात राजा चौधरीची उडी, घटस्फोटित पत्नीवर ओढले ताशेरे

‘ती चांगली आई आहे, मात्र...’; श्वेता- अभिनवच्या वादात राजा चौधरीची उडी, घटस्फोटित पत्नीवर ओढले ताशेरे

मुलगा रेयांश याच्यावरून श्वेता तिवारी आणि अभिनव कोहलीमध्ये सतत वाद होत आहेत. अन् हे वाद आता कोर्टापर्यंत पोहोचले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 20 मे: घराघरात ‘प्रेरणा’ म्हणून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या दक्षिण आफ्रिकेत केपटाउनमध्ये ‘खतरों के खिलाड़ी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. फिटनेसला प्राधान्य देणारी श्वेता या वयातही अत्यंत देखणी दिसते. दोन मुलांची आई असलेल्या श्वेतानं स्वतःमध्ये जबरदस्त परिवर्तन घडवलं आहे. तिच्या या फिटनेसमुळे तिचे सहकलाकारही प्रभावित झाले असून, तिच्या अ‍ॅब्स (Abs) आणि फिटनेसमुळे (Fitness) ती बॉलिवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही मागे सारत आहे. अलिकडेच अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) यानं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला श्वेता तिवारीचा अ‍ॅब्स दाखवतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडीयावरील फोटो आणि व्हिडिओ यामुळे चर्चेत असणारी श्वेता सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत आहे. तिचा मुलगा रेयांश याच्यावरून तिचा दुसरा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) आणि तिच्यात सतत वाद होत आहेत. अभिनवनं श्वेतावर मुलाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर श्वेताचे पहिले पती अभिनेते राजा चौधरी (Raja Chaudhari) श्वेताच्या बाजूनं उभे राहिले असून, श्वेता खूप चांगली आई आणि चांगली पत्नीही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बिग बॉसचे (Big Boss) स्पर्धक असलेल्या राजा चौधरी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ‘श्वेताचे दोन्ही विवाह यशस्वी ठरले नाहीत, हे तिचं दुर्दैव आहे; पण याचा अर्थ असा नाही की ती वाईट आहे. श्वेता खूप चांगली आई आणि उत्तम पत्नीही आहे. श्वेता आणि अभिनव यांच्यात काय चालले आहे यावर मी काही बोलू शकत नाही; पण मला असं वाटतं की श्वेतानं अभिनवला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी.’ ‘एक जोडपं म्हणून तिच्या आणि अभिनवमध्ये लाख समस्या असल्या तरी एक पिता आपल्या मुलाला किंवा मुलीला कधीही दुखवू शकत नाहीत. हे श्वेतानं समजून घेतलं पाहिजे,’ असंही राजा चौधरी यांनी सांगितलं. श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यात वाद वाढत असून, मुलाला भेटण्याची परवानगी आणि त्याची कस्टडी (Custody) मिळण्यावरून सुरू झालेला हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. नुकतेच श्वेता तिवारीनं सोशल मीडियावर आपल्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज अपलोड करून पती अभिनव याच्यावर गंभीर आरोप केले. या व्हिडिओमध्ये अभिनव श्वेताकडून मुलगा रेयांश याला खेचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कलाकारांनी श्वेताला पाठिंबा व्यक्त करत अभिनवच्या अटकेची मागणी केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात