मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी कधीच बिकिनी...' अर्जुन कपूरच्या बहिणीने बॉडी फॅट,स्ट्रेच मार्कबाबत लिहलेली पोस्ट चर्चेत

'मी कधीच बिकिनी...' अर्जुन कपूरच्या बहिणीने बॉडी फॅट,स्ट्रेच मार्कबाबत लिहलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर अशा स्टारकिड्सपैकी एक आहे जी सतत चर्चेत असतात. अंशुला कपूरने अजूनही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नाहीय. परंतु तरीसुद्धा तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर अशा स्टारकिड्सपैकी एक आहे जी सतत चर्चेत असतात. अंशुला कपूरने अजूनही बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नाहीय. परंतु तरीसुद्धा तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांचं लक्ष वेधत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय असतात. आजही असंच काहीसं झालं आहे. अंशुला कपूरने एक पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यातील त्या गोष्टीबाबत खुलासा केला आहे. जो अनेक तरुणींना एक नवा आत्मविश्वास देऊन जाईल. पाहूया अंशुलाने नेमकं काय लिहलंय.

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरला आपल्या हेव्ही वेटमुळे प्रचंड न्यूनगंड होता. तिला कोणताही ड्रेस परिधान करताना आत्मविश्वास वाटत नव्हता. खासकरुन ती शॉर्ट वेस्टर्न ड्रेस घालणं टाळत होती. याबाबतच तिने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये खुलासा केला आहे. परंतु आता अंशुलामध्ये कसा बदल झाला. आणि इतर मुलींनीसुद्धा आपल्यामध्ये आत्मविशास कसा आणावा याबाबत तिने सांगितलं आहे.

अंशुला कपूर इन्स्टाग्राम पोस्ट-

अंशुला कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोतो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहली आहे. यामध्ये ती निळ्या बिकिनीमध्ये स्विमिंग पूलवर आराम करताना दिसून येत आहे, सोबतच कॅप्शनमध्ये लिहलंय, 'मी तीन महिन्यांपूर्वी @priyamganeriwal सोबत संवाद साधत होते की, मी कधीच बिकिनी परिधान करणार नाही. कारण माझ्यामध्ये तितका आत्मविश्वास नाहीय. माझं बोलणं ऐकून @priyamganeriwal ने उत्तर दिलं की, का नाही... तु हे परिधान करायला हवं. अंशुलाने सांगितलं की, बिकिनीबाबत तिच्या मनात अनेक गोष्टी आहेत. तिला वाटतं की, शॉर्ट ड्रेस परिधान करण्यासाठी त्या पद्धतीची शरीरयष्टी लागते जी आपल्याकडे नाहीय.

(हे वाचा:Malaika-Arjun: मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या बहिणीला दिलं खास गिफ्ट; किंमत वाचून व्हाल थक्क )

अंशुलाने पुढं लिहलंय, 'मी याबाबतीत प्रचंड विचार केला. नंतर मला वाटलं आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क लपवण्याची गरज नाहीय. आपल्याला स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला यायला हवं. आणि हेच कारण आहे कि हा फोटो माझ्या खास व्हेकेशन फोटोमधील एक आहे. मला आनंद आहे की मी बिकिनी परिधान केली. आणि आता मला आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि आरामदायक वाटत आहे. काही दिवसांपूर्वी अंशुला कपूरने मोठ्या प्रमाणात आपलं वजन कमी केलं आहे. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचं सोशल मीडियावर मोठं कौतुक झालं होतं. अर्जुनच्या बहिणीने डाएट आणि एक्सरसाइजच्या आधारे स्वतः मध्ये बदल घडवून आणला आहे.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood, Entertainment