मुंबई, 08 ऑक्टोबर : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतो. कधी इन्स्टाग्राम तर कधी ट्वीटर तो #AskSRK हा हॅशटॅग वापरत चाहत्यांना त्याचे प्रश्न विचारण्याची संधी देतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरंही देतो. दसऱ्याच्या निमित्तान शाहरुख खाननं पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. #AskSRK च्या माध्यमातून त्यानं चाहत्यांशी गप्पा मारल्या. शाहरुख सोबत बोलायची संधी मिळते म्हटल्यावर चाहते अशी संधी हातची कशी जाऊ देतील. अनेक चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. काही चाहत्यांना शाहरुखच्या बॉलिवूडमध्ये परतण्याची उत्सुकता आहे तर काहींना शाहरुख आणि त्याचा मुलगा अबराम एकत्र कधी काम करणार याविषयी उत्सुकता आहे. मिलिंद-अंकिताचं लडाखमध्ये रोमँटिक व्हेकेशन, व्हायरल झाला KISSING VIDEO शाहरुख कधी करणार अबरामसोबत काम #AskSRK च्या माध्यमातून शाहरुखला अनेक चाहत्यांनी अबरामबद्दल प्रश्न विचारले. ज्याची उत्तरही शाहरुखनं दिली. एका चाहत्यानं विचारलं, तु अबरामसोबत सिनेमात काम कधी करणार आहेस? यावर शाहरुखनं गंमतीशीर उत्तर दिलं. तो म्हणला, जेव्हा मला त्याच्या डेट्स मिळतील तेव्हा मी नक्की त्याच्यासोबत काम करेन.
याशिवाय एका चाहत्यानं विचारलं, अबरामला तुझा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो. त्यावर अबरामला ‘रा.वन’ सिनेमा जास्त आवडत असल्याचं शाहरुखनं सांगितलं बेडरुममध्ये प्रियांका-फरहानचा रोमान्स, ‘द स्काय इज पिंक’चा UNSEEN VIDEO लीक
https://t.co/wzWFiycsLb https://t.co/OqpSNWsYFX
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 8, 2019
शाहरुख खान मागच्या वर्षी म्हणजेच 2018मध्ये झीरो सिनेमात शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्यानं कोणताही नवा सिनेमा त्यानं साइन केलेला नाही. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यानंतर जवळापास वर्षभर शाहरुख मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या कमबॅकची सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. राखी सावंतनं खरंच केलं लग्न! वाचा तिच्या पतीचा पहिला INTERVIEW ================================================================== VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं