मुंबई, 20 फेब्रुवारी : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. तो काय करतो, कुठे जातो हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. केवळ किंग खानच नाही तर त्याच्या मुलांवर सुद्धा चाहते नजर ठेऊन असतात. आर्यन, सुहाना आणि अबरामबद्दल चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतात. शाहरुखचं सध्या त्याच्या 'पठाण' या चित्रपटासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून कौतुक होत असताना, त्याचा लाडका मुलगा आर्यन खान मात्र पुन्हा एकदा त्याच्या वागण्यामुळे ट्रोल होत आहे. आता काय केलं त्याने नक्की जाणून घ्या.
किंग खानचा मोठा मुलगा आर्यन खान अनेकदा चर्चेत असतो. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून आर्यन खान सर्वांच्या नजरेत आहे. जिथे आधी प्रत्येकजण त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायचा तिथे आता मीडियासमोरच्या त्याच्या वागण्यामुळे त्याला अनेकदा टार्गेट केले जाते. अलीकडे आर्यन खानला मीडियाने स्पॉट केले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यादरम्यान पुन्हा एकदा आर्यन खानला त्याच्या वागण्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
हेही वाचा - Nawazuddin Siddiqui: नवाझुद्दीनच्या अडचणीत वाढ; पत्नीनंतर घरकाम करणाऱ्या महिलेचे अभिनेत्यावर गंभीर आरोप
आर्यन खान त्याच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चर्चेत आहे. विरल भयानीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आर्यन गाडीतून येताना दिसत आहे. गाडीतून उतरल्यानंतर पापाराझी आर्यनला फोटोसाठी पोझ देण्यास सांगत आहेत. पण आर्यन त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून गेल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवरुन आर्यन पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.
View this post on Instagram
आर्यनच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत 'हा नेहमी वेगळ्याच अटिट्यूडमध्ये असतो. याला कधीच स्माइल करताना पाहिलेलं नाही' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने 'वडिलांच्या पैशाच्या अटीट्युड आहे.' असं म्हटलं आहे. काहींनी त्याच्या कपड्यांवरुनही त्याला ट्रोल केलं आहे. 'कपडे उंदराने खाल्ले आहेत का?' असं एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने 'पोलिसांनी इतकं मारलं की कपडे फाटले' असं म्हणत आर्यनची खिल्ली उडवली आहे. 'घाईघाईत फाटलेले कपडे घातले वाटतं', असंही एकाने म्हटलं आहे.
शाहरुखचा लेक आर्यन खान मनोरंजन विश्वातील पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आर्यनने नुकतंच त्याच्या आगामी प्रोजेक्टचं लिखाण पूर्ण केलं आहे. अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून आर्यन कलाविश्वात पदार्पण करणार आहे. याबद्दल अजून अधिक माहिती समोर आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Shah Rukh Khan