शिखा पांडे (नवी दिल्ली), 10 मे : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आजकाल त्याच्या लक्झरी कपड्यांच्या ब्रँड D’YAVOL X मुळे चर्चेत आला आहे. परंतु आर्यन खान हा त्याच्या किंमतीमुळे चर्चेत आला आहे. आर्यनने स्वत: कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. ज्याची किंमत जाणून सर्वांनाच धक्का बसला आहे. शाहरुख खाननेही सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या महागड्या कपड्यांच्या ब्रँडचा खरपूस समाचार घेतला आहे. यावरून सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू आहे.
शाहरुख खान वेळोवेळी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असतो. अलीकडेच, त्याने चाहत्यांसह एक हॅशटॅग आस्क एसआरके अशी टॅगलाईन सुरू केले होते. ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांनी आर्यन खानच्या लक्झरी कपड्यांच्या ब्रँड D’YAVOL X च्या किंमती कमी करण्याची विनंती केली, ज्यावर शाहरुखने प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकअपनंतरही कमी झाली नाही जवळीकता? तब्बूसोबतच्या अफेअरवर नागार्जुनची अशी होती प्रतिक्रियायावेळी एका नेटकऱ्याने शाहरूख खानला ट्वीट करत सूचना केली आहे. ‘या D’YAVOL X जॅकेटची किंमत 1000-2000 रुपये आहे. लोक विकत घेतील का ते यावर किंग खान म्हणाला माझा मुलगा मलाही कपडे स्वस्त देत नाही मलाच आता काहीतरी करावं लागेल असे म्हणत शाहरुखने उत्तर दिले आहे.
D’YAVOL X ब्रँडच्या कपड्यांची किंमत हजारांपासून लाखांपर्यंत आहे. जी खरेदी करणे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर आहे. या ब्रँडचे टी-शर्ट 20 हजारांपासून सुरू होतात. सुपर महागडा ब्रँड असूनही आर्यन खानच्या ब्रँडला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महागड्या कपड्यांवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. या कपड्यांमध्ये काय आहे की त्यांची किंमत इतकी जास्त आहे अशा प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. यावर अनेकांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. तरीही आर्यनने विक्रीस आणलेल्या सगळ्या कपड्यांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे आर्यन खानने या ब्रँडची जाहिरात दिग्दर्शित केली होती.