जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ब्रेकअपनंतरही कमी झाली नाही जवळीकता? तब्बूसोबतच्या अफेअरवर नागार्जुनची अशी होती प्रतिक्रिया

ब्रेकअपनंतरही कमी झाली नाही जवळीकता? तब्बूसोबतच्या अफेअरवर नागार्जुनची अशी होती प्रतिक्रिया

तब्बूसोबतच्या अफेअरवर नागार्जुनची अशी होती प्रतिक्रिया

तब्बूसोबतच्या अफेअरवर नागार्जुनची अशी होती प्रतिक्रिया

नागार्जुन आणि तब्बू रिलेशनशीपमध्ये होते तोपर्यंत ते कुणालाही काहीही बोलले नाहीत, पण जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा दोघांनी वेगवेगळ्या वेळी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्या नात्याचं सत्य सांगितलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 मे- नागार्जुन आणि तब्बूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. या दोघांनी एकत्र अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत.या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. चित्रपटांसोबतच नागार्जुन आणि तब्बू यांच्या अफेअरची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. असे म्हटले जाते की, दोघांनी जवळजवळ एक दशक एकमेकांना डेट केले परंतु त्यांनी लग्न केले नाही. जोपर्यंत नागार्जुन आणि तब्बू रिलेशनशीपमध्ये होते तोपर्यंत ते कुणालाही काहीही बोलले नाहीत, पण जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा दोघांनी वेगवेगळ्या वेळी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्या नात्याचं सत्य सांगितलं. 2017 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन म्हणाली होती की, तब्बूचं नाव घेताच माझा चेहरा उजळून निघतो. हो तब्बू माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री तेव्हापासून आहे, जेव्हा मी 21 वर्षाचा होतो आणि ती फक्त 16 वर्षांची होती. आम्ही जवळजवळ अर्ध्याला वर आयुष्य एकत्र घालवले आहे. आमच्या मैत्रीबद्दल बोलेल तेवढं कमी आहे. आमच्या मैत्रीत लपवण्यासारखं असं काहीच नाही. वाचा- द केरळ स्टोरी’ ने चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी; लवकरच पार करणार मोठा टप्पा तुम्ही जेव्हा तब्बूचं नाव घेता तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एकप्रकारची लखाखी येते, यावरूनच तुम्ही समजू शकता. आता मी जेव्हा अशा गोष्टी बोलतो, तेव्हा तुम्ही त्याचा एक वेगळा अर्थ लावता कारण हा तुमचा दृष्टिकोन आहे… माझ्यासाठी ती एक सुंदर व्यक्ती आहे आणि ती नेहमीच एक प्रिय मैत्रीण राहिल.

News18लोकमत
News18लोकमत

2007 मध्ये जेव्हा तब्बू करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये आली होती, तेव्हा तिने नागार्जुन आपला सर्वात जवळचा मित्र असल्याचे सांगितले होते. यावेळी तिनं त्याच्यासबोतचं माझं नातं हे सर्वात महत्त्वाचं असल्याचे म्हटलं होतं. माझं त्याच्याशी असलेलं नातं मला खूप प्रिय आहे आणि त्याच्यासोबतचं माझं नातं कधीही बदलू शकत नाही आणि कधीच बदलणार नाही. मला या नात्याला कोणतचं लेबल लावयचं नाही आणि मला यावर आणखी काही बोलायची गरज नाही असं देखील तब्बू म्हणाली होती. मुंबई सोडून तब्बून हैदराबादमध्ये घेतलं होतं घर 1992 या साली नागार्जुन व तब्बूच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. दोघांची पहिली भेट ‘शिशिंद्री’च्या सेटवर झाली होती. त्याकाळात दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आणि बघता बघता दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.दोघांनी आपल्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होत आणि यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा आणखी जोरात सुरू होतं.नागागर्जुन विवाहित होता. पण तब्बू त्यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून हैदराबादेत नागार्जुन राहायचा अगदी तिथेच घर घेतलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात