जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Brahmastra : ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर; कोणती भूमिका साकारणार शाहरुख पाहा

Brahmastra : ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर; कोणती भूमिका साकारणार शाहरुख पाहा

Shahrukh khan first look from Brahmastra

Shahrukh khan first look from Brahmastra

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक कॅमिओ आहे, आता त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 सप्टेंबर :  बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यांच्यासोबतच चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय या कलाकारांचे पॉवर पॅक्ड भूमिका बघायला मिळणार आहेत. तसेच ब्रम्हास्त्र मध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हेही दिसणार आहेत अशा चर्चा होत्या.  ब्रम्हास्त्र चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तर या चर्चांना अधिकच उधाण आले होते. आता या चित्रपटातील शाहरुख खान असणार हे जवळजवळ पक्कंच झालं आहे. मध्यंतरी  भूमिकेचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. तेव्हा चाहते शाहरुख या चित्रपटात असल्याचा अंदाज बांधत होते. मात्र आता लीक झालेल्या व्हिडिओप्रमाणेच एक पोस्ट चित्रपटाचा निर्माता करणं जोहरने शेअर केली आहे. त्यामुळे चित्रपटात शाहरुख असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहेत.

जाहिरात

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात  शाहरुख खान वानर अस्त्राची भूमिका साकारणार आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाचा ट्रेलरमध्येच शाहरुखची झलक दिसली होती. त्यामुळे सिनेमातील शाहरुखचा लूक पाहण्यासाठी चाहते आतुर होते. मात्र आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. नुकताच शाहरुखचा सिनेमातील लूक समोर आला आहे. करण जोहरने शेअर केलेल्या या  व्हिडिओंमध्ये  शाहरुख खान रक्ताने माखलेल्या अवतारात दिसत आहे. तो हवेत उंचावत उडी मारताना दिसत आहे. ब्रम्हास्त्र मधील हे फोटो पाहून शाहरुख खानचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. या व्हिडीओ आणि फोटोला प्रचंड लाईक्स आणि शेअर मिळतायत. बऱ्याच दिवसांनी शाहरुख खानला एका नव्याकोऱ्या भूमिकेत पाहता येणार आहे. हेही वाचा - KBC 14 : केबीसीच्या मंचावर महिला स्पर्धकासोबत शेकहॅन्ड करताना बिग बीसोबत घडला विचित्र प्रकार; समोर आला VIDEO अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदाच नवविवाहित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहेत. नुकतेच  चित्रपटातील दुसरे गाणे ‘देवा देवा’  प्रदर्शित झाले आहे. हा सिनेमा प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सिनेमात प्रेक्षकांना रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील लव्ह केमिस्ट्री तसेच ब्रह्मास्त्रावरील युद्ध पाहायला मिळणार आहे.  हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बॉलिवूडमध्ये सध्या बजेट सिनेमांविषयी  नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन असे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तयार होणाऱ्या अनेक चित्रपटांना हवे तसे यश मिळवता आलेले नाही. त्यात सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांचं नशीब पणाला लागलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉलिवूडच्या नावेला तारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात