मुंबई, 8 मार्च- बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यामध्ये अवैध पद्धतीनं घुसण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात काही लोकांनी केला. याप्रकरणी गेल्या आठवड्यात दोन अज्ञात तरुणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. हे दोन अज्ञात तरुण तब्बल आठ तास शाहरूखच्या मेकअपरूममध्ये लपल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि 452, 34 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींचे नावे पठाण साहिल सलीम खान आणि राम सराफ कुशवाह अशी असून दोघेही गुजरातमधील भरूच येथील रहिवासी आहेत. वाचा- ‘तुझी तू रहा…’ महिला दिनानिमित्त अरुंधती फेम मधुराणीचा मैत्रिणींना खास सल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन्ही आरोपी गुपचूप मन्नतमध्ये गेले आणि तिसऱ्या मजल्यावरील मेकअप रुममध्ये जवळपास 8 तास शाहरुख खानची वाट पाहत लपुन राहिले. ते पहाटे 3 वाजता मन्नतमध्ये दाखल झाले आणि सकाळी 10.30 वाजता त्यांना पकडण्यात आले.’
They hid in Shah Rukh Khan's make-up room for 8 hours: Mumbai Police on 'Mannat' trespassing
— ANI Digital (@ani_digital) March 8, 2023
Read @ANI Story | https://t.co/6lBe24yG3T
#ShahRukhKhan𓀠 #mannat #mannattrespassing pic.twitter.com/Dsh8ST8cRV
एफआयआरनुसार, मन्नतच्या हाऊसकीपिंग स्टाफमध्ये काम करणारा सतीश जेव्हा तिथे साफसफाई करण्यासाठी मेकअप रुममध्ये पोहोचला तेव्हा त्याला हे दोघे तिथे लपलेले दिसले. त्यानंतर सतीशने दोघांनाही तेथून लॉबीमध्ये नेले आणि अचानक या दोघांना तिथे पाहून शाहरुख खान आश्चर्यचकित झाला. त्यानंतर मन्नत बंगल्याचे गार्ड्स आले आणि त्यांनी त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.मन्नतचे व्यवस्थापक कॉलीन डिसोझा यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितलं की, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांना सुरक्षा रक्षकाचा फोन आला की दोन लोक लपून बसले आहेत.
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भुमिका होत्या. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. पठाण सिनेमाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगलेली पाहयला मिळाली. आतालवकरच शाहरुखचा जवान आणि डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.